Sonam Rai-Khan: ‘मी बिकिनी मॉम बनण्यास तयार, सेक्सी म्हणणं..’, अभिनेत्रीची बेधडक मुलाखत

रोहित गोळे

ADVERTISEMENT

veteran actress sonam rai khan said i am ready to become a bikini mom all set for digital debut said i dont mind doing sexy roles
veteran actress sonam rai khan said i am ready to become a bikini mom all set for digital debut said i dont mind doing sexy roles
social share
google news

Sonam Rai-Khan Bikini Role: मुंबई: बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकात आपल्या ग्लॅमरस अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री सोनम राय (Sonam Rai) हिने सलग सात वर्षांत जवळपास 37 चित्रपटात काम केलं. मात्र, चार वर्षांनंतर सोनमने अचानक इंडस्ट्रीला अलविदाच केला नाही तर देशही सोडला. आज सोनमने 33 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. ती तिच्या पुनरागमन आणि स्वप्नातील भूमिकांबद्दल मोकळेपणाने बोलत असते. (veteran actress sonam rai khan said i am ready to become a bikini mom all set for digital debut said i dont mind doing sexy roles)

आज तक डॉट इनशी बोलताना सोनम म्हणाली, ‘मी माझ्या मनाला स्पर्शून जाईल अशा कामाच्या शोधात आहे. ते काहीही असू शकते, नकारात्मक किंवा सकारात्मक भूमिका, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. मला पडद्यावर माझ्याच वयाची भूमिका करायची आहे. मी 51 वर्षांची आहे आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणि संवेदनशीलतेला साजेशी अशीच व्यक्तिरेखा मी करेन. मला अशी भूमिका हवी आहे, ज्याशिवाय कथा पुढे जाऊ शकत नाही.’

सोनमला हवी आहे ‘अशी’ भूमिका

सोनम पुढे म्हणते, ‘मिर्झापूरमधील रसिका दुग्गलच्या भूमिकेने मला खूप प्रभावित केले आहे. मला तिचे काम खूप आवडते. त्या वेब सीरीजमध्ये तिची इतकी दमदार भूमिका आहे की, ती तिथे नसतानाही लोक तिची वाट बघतात. तुमच्याकडे केंद्रीभूत भूमिका नसली तरी तुम्ही त्या छोट्याशा भूमिकेतही जीव आणू शकता, हे तिने सिद्ध केले आहे.’ असं सोनम म्हणाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्याची तोडफोड; नेमकं काय घडलं?

मी ‘सेक्सी माँ; बनायलाही तयार…

ओटीटी क्रांतीबाबत सोनम म्हणते, ‘ओटीटीने प्रत्येक सिनेमांची चौकट मोडली आहे. कलाकारांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मी फक्त OTT मुळे परत येण्याचा निर्णय घेतला आहे. मला हे व्यासपीठ एक्सप्लोर करायचे आहे. मी सर्व प्रकारच्या प्रयोगांसाठी तयार आहे. मी बिकिनी मॉम बनण्यासही तयार आहे. यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही. जर मी त्यावेळी सेक्सी सोनम असते तर आजही मी सेक्सी सोनम असू शकते. मला सेक्सी म्हणण्यात कधीच वाईट वाटले नाही. मी ते कधीही शिवी म्हणून घेतलेले नाही. जर मला कोणी सेक्सी आईची भूमिका ऑफर केली तर मला आनंद होईल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Khan (@sonamkhan_72)

ADVERTISEMENT

‘कोणास ठाऊक, मी पुन्हा बिकिनी घालून लोकांना आश्चर्यचकित करू शकते. कोणी तरी म्हटलं की, 50 वर्षांची स्त्री बिकिनी घालू शकत नाही. पण हा स्टिरिओटाइप मोडायलाही मी तयार आहे.’ असं आव्हानच सोनमने दिलं आहे.

ADVERTISEMENT

‘जर तुम्ही दबाव हाताळू शकत नसाल तर इंडस्ट्री सोडा’

अभिनेत्रींवर सुंदर दिसण्याच्या दबावाबाबत सोनम म्हणाली की, ‘हो, खूप दडपण असते. विशिष्ट मार्गाने दिसण्याचा किंवा स्वतःला सादर करण्याचा सतत दबाव असतो. हे सगळं करायचं नसेल तर इथून निघून जाणं हाच पर्याय उरतो. मात्र, केवळ चित्रपटसृष्टीलाच का लक्ष्य केले जाते? जगभरातील महिला या दबावातून जातात. त्यांच्यावर सर्व प्रकारची बंधने किंवा पाळत असते.’

हे ही वाचा >> Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा रिस्की ब्लाऊज अन्…

‘आज, जर तुम्ही एखाद्या पुरुषाला थोड्याशा लठ्ठ मुलीशी लग्न करण्यास सांगितले तर तो दोनदा विचार करतो. हा दबाव सर्वत्र आहे. महिलांना सर्वत्र हा भेदभाव सहन करावा लागत आहे. आम्हा महिलांना नेहमीच या भेदभावाचा सामना करावा लागला आहे. आपण जिमला जातो, आपल्या वजनावर सतत लक्ष ठेवतो… आपल्याला तरुण दिसायचे आहे… इतका दबाव का आहे?’ असा सवालही यावेळी सोनमने विचारला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT