Chandrayaan-3 : विक्रम लँडरवर ‘सोनेरी कोटिंग’ का लावलं जातं तुम्हाला माहितीये का?
विक्रम लँडरवरील सोनेरी कोटिंग किंवा इतर कोणत्याही अंतराळयानाचे सिल्व्हर शीट बहुतेक वेळा अॅल्युमिनियम कोटेड पॉलिमाइडचा एक थर असतो. त्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम आहे आणि बाहेरून सोनेरी रंग असल्यामुळे त्यावर सोन्यासारखी कोटिंग दिसते.
ADVERTISEMENT

Vikram lander Why Coated With Golden Foil Know the Reason : चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोचं हे मोठं यश आहे. तसंच भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यावेळी लँडरचे फोटो पाहिल्यावर तुमच्याही मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की, यावर सोनेरी कोटिंग का असतं? चला तर मग आज याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Chandrayaan-3 Do you know why Golden Coating is applied on Vikram lander)
भौतिकशास्त्रात (Physics) आपण इन्सुलेटर हा शब्द ऐकला आहे. अशी कोणतीही वस्तू, उपकरण किंवा घटक ज्याद्वारे उष्णता किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऊर्जा येऊ किंवा जाऊ शकत नाही. अंतराळयान किंवा सॅटेलाइटवरील फॉइल सारखी दिसणारी ही गोष्ट प्रत्यक्षात मल्टी-लेयर इन्सुलेशन (MLI) आहे. हे मल्टी लेयर इन्सुलेशन अनेक रिफ्लेक्टिव्ह फिल्म्सपासून बनलेले आहे. जे खूप हलके असतात आणि त्यांची जाडी वेगवेगळी असते.
BRICS Summit : शी जिनपिगं भेटताच PM मोदी काढला मुद्दा, काय झाली चर्चा?
MLI चे सर्व स्तर सामान्यतः पॉलिमाइड किंवा पॉलिस्टर (एक प्रकारचे प्लास्टिक) चे बनलेले असतात. आणि या थरांवर अॅल्युमिनियमची कोटिंग देखील असते. प्लॅस्टिक, अॅल्युमिनियम आणि इतर थरांमध्ये कोणता थर हलका किंवा जाड आहे, ते कोणत्या प्रमाणात वापरले गेले आहेत, हे सर्व सॅटेलाइट किंवा अंतराळयान कोणत्या कक्षेत फिरेल यावर अवलंबून असते.
विक्रम लँडरवरील सोनेरी कोटिंग किंवा इतर कोणत्याही अंतराळयानाचे सिल्व्हर शीट बहुतेक वेळा अॅल्युमिनियम कोटेड पॉलिमाइडचा एक थर असतो. त्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम आहे आणि बाहेरून सोनेरी रंग असल्यामुळे त्यावर सोन्यासारखी कोटिंग दिसते.