Israel-Hamas War: इस्रायलला नष्ट करण्याचा डाव, निष्पाप जीवांचा क्रूर छळ… ‘हमास’चा इतिहास काय?

रोहिणी ठोंबरे

Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भयानक हल्ला केला. अचानक केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ADVERTISEMENT

Israel-Hamas War History of Hamas an Islamic extremist organization that fired rockets on Israel
Israel-Hamas War History of Hamas an Islamic extremist organization that fired rockets on Israel
social share
google news

Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भयानक हल्ला केला. अचानक केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Israel-Hamas War History of Hamas an Islamic extremist organization that fired rockets on Israel)

पाच हजार रॉकेटच्या डागल्यामुळे मृतांसह जखमींची संख्याही 1000 पेक्षा जास्त आहे. हा हल्ला पॅलेस्टिनी अतिरेक्यांचा गेल्या दशकांपासूनचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. इथे इस्रायल संपूर्ण आक्रमकतेने गाझाविरुद्ध आपले ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ चालवत आहे.

हल्ल्याची सुरूवात हमासने केली. अल-अक्सा मशिदीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी ते लढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा त्यांच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराचा आणि वेस्ट बँकेवर मिळवलेल्या ताब्याचा बदला असल्याचं म्हटलं आहे. खरं म्हणजे, आजची इस्रायलची जमीन गाझा पट्टी आणि वेस्ट बँक यांच्यामध्ये आहे. दोघांवर पॅलेस्टिनी प्राधिकरणाची सत्ता आहे. गाझा पट्टीवर हमासचे नियंत्रण आहे. 2006 मध्ये झालेल्या निवडणुकीत हमास सत्तेवर आला आणि तेव्हापासून सत्तेत आहे. यामुळेच, सध्या घडलेल्या या हिंसाचाराबाबत समजून घेण्यासाठी आज आपण हमासचा इतिहास जाणून घेऊयात.

हमासच्या स्थापनेची कहाणी

इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा सामायिक इतिहास हिंसाचाराने भरलेला आहे. हा हिंसाचार इस्रायलच्या निर्मितीपूर्वीपासून सुरू आहे आणि त्याच्या निर्मितीनंतर अधिक तीव्र झाला आहे. याच तीव्रतेचा एक अध्याय म्हणजे ‘हमास’ आहे. जी एक अतिरेकी इस्लामिक संघटना म्हणून ओळखली जाते. इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांनी याला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp