Health: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत अंडी, नाहीतर... - people who have diabetes obesity kidney problems should never consume eggs in excess - MumbaiTAK
नॉलेज बातम्या

Health: ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत अंडी, नाहीतर…

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने त्याचा जसा शरीराल फायदा असतो, तसेच त्याचा तोटाही अधिक असतो. त्यामुळे किडनी, मधुमेहचा त्रास असणाऱ्या लोकांनी अंडी नाही खाल्ली तरच त्याचा त्यांना फायदा होत असतो.
people who have diabetes obesity kidney problems should never consume eggs in excess

EGGS: हिवाळा (winter) सुरु झाल्यानंतर थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते, तस तसे अंडी खाणारे जे शौकीन आहेत, त्यांच्याकडून सकाळी आणि संध्याकाळी उकडलेले अंडे खाण्यास सुरुवात करतात. शरीरासाठी अंड्याचे सेवन केल्यानंतर शरीर उबदार राहण्यास मदत होते. त्यामुळे अंड्याचे अनेक फायदे आरोग्याला होता असतात. आरोग्यासाठी अंड्यांचे फायदे असल्यामुळेच ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ अशी म्हण लोकांमध्ये रूढ झाली आहे. अंडे म्हणजे प्रथिनांचा मोठा स्रोत मानला जातो. त्यामुळे अंड्यांमध्ये केवळ प्रथिनेच नाहीत तर कॅल्शियम, जीवनसत्त्वे, (Calcium, vitamins) खनिजे यांसारखे इतर अनेक पोषक घटकही मुबलक प्रमाणात आढळत असतात.

त्यामुळेच त्याचा आरोग्याला (Health Benefits) डबल फायदा होत असतो. अंडी खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांनी अंडी जास्त खाल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी त्याचा तोटाच होतो. त्यामुळे कोणत्या लोकांनी अंडी खावी आणि खाऊ नयेत हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(people who have diabetes obesity kidney problems should never consume eggs in excess)

कोलेस्ट्रॉल

अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. एका अंड्यामध्ये जवळजवळ 180 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असतात. दिवसातून 2 पेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. जर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचाही झटका, स्ट्रोक आणि अगदी हार्ट ब्लॉकेजचा धोकाही वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला आधीच कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक असेल तर अंड्याचे जास्त सेवन केल्यामुळे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते.

मधुमेह

ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबेटिजचा त्रास असेल त्या रुग्णांनी निरोगी राहण्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर अधिक लक्ष दिले पाहिजे. मात्र तुम्हाला मधुमेह असेल त्याचा त्रास होत असेल आणि तुम्हाला अंडी खाण्यास आवडत असतील तर मात्र त्याचा तोटा तुम्हाला सहन करावा लागेल. कारण अंडी खाण्याचे प्रमाण वाढले तर मात्र मधुमेहाचा त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. अंड्यांमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल आणि फॅट इन्सुलिनमुळे रेझिस्टन्स वाढते. त्यामुळे,शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाचा धोका अधिक वाढतो.

हे ही वाचा >> ‘होय माझ्या पाठीशी मोठी शक्ती’, जरांगे-पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

लठ्ठपणा:

अंड्यांमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे अंडी सेवन करणाऱ्यांना वाटते की, अंड्याचे सेवन केल्याने वजन कमी होते, त्यामुळे वजन करण्यास मदत होते. मात्र वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. जर अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्यामध्ये असलेले फॅट आणि प्रोटीनमुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी तुमचे वजन वाढण्याचीच शक्यता अधिक असते.

मूत्रपिंड :

अंडी खाल्याने मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असतात हे सर्वांना माहितीच आहे. मात्र शरीरावर प्रथिनांचा अतिमारा झाला तर मात्र किडनी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अंडी सेवन करावी असा सल्ला दिला जातो.

लूज मोशन :

जर तुमचे पोट अनेकदा खराब होत असेल किंवा जुलाबाचा त्रास होत असेल तर अंडी अजिबात खाऊ नका. अडी खाल्ल्यास उष्णतेचा त्रासही संभवत असतो. त्यामुळे पोट खराब झाल्यास असणाऱ्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात पेटके येणे, फुगणे, मळमळणे, गॅस, उलट्या होणे या सारख्या समस्या तुम्हाला येत असतात.

हे ही वाचा >> Covid 19 : कोरोना लसीमुळे भारतात होतायेत तरुणांचे मृत्यू?, ICMR चा रिपोर्ट

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग