16 December 2024 Gold Rate: सोनं खरेदी करण्याची गोल्डन चान्स! मुंबईत सोनं झालं 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
Today Gold And Silver Rate : सोन्याच्या दरात आज सोमवारी 16 डिसेंबरला पुन्हा एकदा घट झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅममध्ये 100 रुपयांची घट झाली आहे. याआधी सोन्याच्या भावात एक रुपयांपर्यंत घसरण झाली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
सोन्याचे 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव काय?
मुंबईत सोन्याच्या 1 तोळ्याचा भाव काय?
Today Gold And Silver Rate : सोन्याच्या दरात आज सोमवारी 16 डिसेंबरला पुन्हा एकदा घट झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅममध्ये 100 रुपयांची घट झाली आहे. याआधी सोन्याच्या भावात एक रुपयांपर्यंत घसरण झाली होती. मागील तीन दिवसांपासून सोन्याचे कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78000 रुपयांच्या पुढे आहे.
तर 22 कॅरेट सोन्याचे दर 71 हजारांपार आहे. मार्केट एक्स्पर्टने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. आज 16 डिसेंबरला चांदीचे भाव फ्लॅट आहेत. एक किलोग्रॅम चांदीचा रेट 95500 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट गोल्ड रेट काय आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78030 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71540 रुपये आहे.
मुंबई
मुंबईत सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77880 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71390 रुपये आहे.










