ब्रेस्ट फीडिंग करताना महिला रिचवत होती बिअर, फोटो अपलोड केला अन्...

मुंबई तक

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला तिच्या बाळाला स्तनपान करताना बिअर पीत असल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

ब्रेस्ट फीडिंग करताना महिला रिचवत होती बिअर
ब्रेस्ट फीडिंग करताना महिला रिचवत होती बिअर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाळाला स्तनपान करताना महिला पीत होती बिअर

point

महिलेने स्वत: LinkedIn वर शेअर केलाय फोटो

point

फोटो अपलोड केल्याने महिलेवर टीका

Viral Photo: ओल्गा व्हॅलचिन्स्का या झेक महिलेने अलीकडेच LinkedIn वर एक फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये ती एका हातात बिअरची बाटली धरून समुद्रकिनाऱ्यावर बसली आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्या बाळाला दूध पाजताना दिसत आहे. (a woman was drinking beer while breast feeding a debate started when her picture appeared on the internet)

ओल्गाने सांगितले की, हा फोटो 10 वर्षांपूर्वी थायलंडमध्ये काढला होता. तिने हे LinkedIn वर पोस्ट केले कारण ती पहिल्यांदा मुलांशिवाय सुट्टीवर जात आहे.

हे ही वाचा>> Extramarital Affairs: 'यासाठी' विवाहबाह्य संबंध ठेवतात स्त्री-पुरुष, कारण संसार...

ओल्गाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या 12 वर्षांत ती 18 महिने गरोदर होती आणि 71 महिने आपल्या मुलांना स्तनपान केलं. आता ती फेब्रुवारीमध्ये तिच्या पहिल्या सोलो व्हेकेशनवर जात आहे आणि याच काळात तिचे पुस्तक लिहिण्याचा विचार सुरू आहे.

Reddit वर वाद सुरू झाला

काही लोकांनी हे फोटो पाहून हा बेजबाबदारपणा असल्याचे म्हटले आहे. स्तनपान करताना अल्कोहोल पिणे मुलासाठी हानिकारक असू शकते. त्याच वेळी, काही लोकांनी तिचा बचाव केला आणि सांगितले की अल्कोहोलचा प्रभाव लगेच दुधापर्यंत पोहोचत नाही आणि ते पूर्णपणे सुरक्षित असू शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp