Kala Pani Jail : अंगावर येतो काटा… सावरकरांना ठेवलेल्या काळा पाणी तुरुंगाचा इतिहास काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

History of Andaman Cellular Jail : भारतीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 24 डिसेंबर 1910 रोजी अंदमान येथील काळा पाणी तुरूंगात, काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. द स्टोरी ऑफ माय ट्रान्सपोर्टोशन फॉर लाइफ या त्यांच्या पुस्तकात सावरकरांनी लिहिलं की, जेव्हा ते पहिल्यांदा सेल्युलर जेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी जेलर डेव्हिड बॅरीच्या तोंडून हे शब्द ऐकले की, ‘तुम्हाला ही भिंती दिसत आहे. ती एवढी खाली का आहे माहीत आहे का? कारण त्यांच्या पलीकडे हजार मैलांपर्यंत फक्त समुद्र आहे. त्यामुळे या ठिकाणाहून पळून जाणे अशक्य आहे.’ (Cellular Jail Kala Pani history where Veer Savarkar was sentenced to black water)

डेव्हिड बॅरी ज्या जेलबद्दल बोलत होता. ते आपण काळा पाणी या नावाने ओळखतो. अंदमानच्या सेल्युलर जेलला काला पाणी का म्हटले जाते? भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध तुरुंगाची कहाणी काय आहे आणि त्याचे नाव ऐकताच लोक का थरथर कापायचे. आज आपण सेल्युलर जेल उर्फ ​​सजा-ए-काला पानी याबद्दल आपण जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ganesh Visarjan 2023 Mumbai : ‘…आता डोळे भरुन आलेत बाप्पा तुला पाहुन जाताना’

काळा पाणी हे नाव कसं पडलं?

काळा पाणीची कहाणी 1857 पासून सुरू झाली. क्रांतीच्या काळात आणि क्रांतीनंतरही इंग्रज पकडलेल्यांना फासावर लटकवायचे किंवा तोफेच्या तोंडाला बांधून उडवायचे. तसंच, सर्वांसोबत असं घडलं नाही. अनेकांना कैद करण्यात आलं आणि बंडाच्या भीतीने इंग्रजांनी त्यांना मुख्य भूमीपासून दूर पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी अंदमान बेटाची निवड करण्यात आली. अंदमान बेटांवर पाठवताना समुद्रातून प्रवास करावा लागला.

त्याकाळी हिंदूंमध्ये अशी समजूत होती की समुद्र ओलांडून प्रवास केल्यास धर्म भ्रष्ट होतो. अशा लोकांना त्यांच्या जातीबाहेर टाकण्यात आले. यामुळेच समुद्राच्या पाण्याला काळे पाणी म्हटले गेले आणि म्हणूनच अंदमान तुरुंगाला काळ्या पाण्याची शिक्षा असे नाव पडले.

ADVERTISEMENT

1857 नंतर प्रथमच 200 कैद्यांना अंदमानला पाठवण्यात आले. 1868 मध्ये कराचीतून 700 कैदी पाठवण्यात आले. सुरुवातीला या लोकांना घरासारख्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. 1890 पर्यंत कैद्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यावेळी अंदमान कारागृहाचे ते स्वरूप नव्हते जे नंतरच्या काळात विकसित झाले. मुख्य भूमीच्या तुरुंगांपेक्षा अंदमानमध्ये अधिक स्वातंत्र्य होते. त्यामुळे कैदी येथे येण्यास प्राधान्य देत असत.

ADVERTISEMENT

1890 मध्ये दोन ब्रिटीश अधिकाऱ्यांना यात अडचण येऊ लागली. ते म्हणाले, ‘तुरुंगाच्या नावाखाली स्वातंत्र्य कसे देता येईल?’ चार्ल्स लायल आणि एएस लेथब्रिज – या दोघांनी एक अहवाल तयार केला आणि तो सरकारला सादर केला. ज्यामध्ये नवीन कारागृह बांधण्याची मागणी करण्यात आली होती. आणि येथे येणाऱ्या कैद्यांसाठी कडक वातावरण असावे, अशी सूचनाही करण्यात आली. शासनाच्या मान्यतेनंतर 1896 मध्ये नवीन कारागृहाचे काम सुरू झाले.

त्यासाठी ब्रह्मदेशातून लाल विटा आणण्यात आल्या आणि जे कैदी भविष्यात त्यात राहणार होते तेच कैदी मजुरीसाठी वापरण्यात आले. या तुरुंगाचा आकारही अगदी अनोखा होता. आणि या तुरूंगाच्या रचनेमागेही एक रंजक कथा आहे.

Mulund : मराठी महिलेला ऑफिससाठी नाकारली जागा, पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांची ‘अ‍ॅक्शन’

तुरूंगाची रचना कशी ठरली?

खरं तर, 19व्या शतकात ब्रिटनमध्ये एक महान तत्त्वज्ञ होता. त्याचे नाव जेरेमी बेंथम होते. बेंथम हे उपयुक्ततावाद नावाच्या विचारसरणीचे ध्वजरोहक होते. उपयुक्ततावाद सांगायचं तर, जे चांगले आहे त्याचा किती लोकांना त्याचा फायदा होईल हे ठरवले जाईल. ज्या पद्धतीचा सर्वाधिक लोकांना फायदा होतो ती सर्वोत्तम आहे. पण या विचारसरणीत एक अडचण आहे. या तत्त्वज्ञानानुसार एका व्यक्तीला मारून पाच जणांना वाचवता येते. त्यामुळे एखाद्याला मारण्यात काही नुकसान नाही. त्यामुळे या तत्त्वज्ञानाच्या आधारे समाजाचा कसा फायदा होऊ शकतो हे बेंथमने सांगायला सुरुवात केली.

का माहीत नाही पण त्याची नजर आधी तुरुंगात गेली. बेंथम म्हणाला, कारागृहाच्या रचनेत अडचण आहे. कारागृहात कैद्यांच्या संख्येच्या प्रमाणात पहारेकरी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांची कामे वाया जातात. त्यामुळे तुरुंगांचा आकार बदलला पाहिजे. बेंथमने तुरुंगाच्या आकारासाठी एक नवीन सूचना दिली, ज्याला त्याने पॅनॉप्टिकॉन असे नाव दिले.

ही नवीन रचना अशी होती की एकच रक्षक संपूर्ण कारागृहावर लक्ष ठेवू शकेल. बेंथमच्या हयातीत ही कल्पना फारशी लोकप्रिय झाली नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने विचार केला.

अंदमानमधील हे तुरुंग पॅनॉप्टिकॉन डिझाइननुसार बांधले गेले. ही रचना सायकलच्या चाकासारखी होती. अंदमान कारागृहाच्या मध्यभागी एक मोठा टॉवर बांधण्यात आला. टॉवरच्या वरती पहारेकऱ्याला उभं राहण्यासाठी जागा होती आणि तिथे एक घंटा जोडलेली होती जेणेकरून काही गडबड झाली तर बेलच्या आवाजाने सगळ्यांनी सावध व्हावं. या टॉवरच्या बाहेर सायकलच्या स्पोकच्या आकारात सात इमारती बांधल्या होत्या. प्रत्येक विंगला तीन मजले होते, त्यातील एका खोलीचा आकार 14.8*8.9 फूट होता. संपूर्ण कारागृहात असे 696 सेल होते. या सेलमुळे या जेलला सेल्युलर जेल असे नाव पडले. या सेल म्हणजेच खोल्या अशा प्रकारे बनवण्यात आल्या होत्या की, इतर कैद्यांशी कोणीही संपर्क करू शकत नाही.

प्रत्येक खोलीत सुमारे 9 फूट उंचीवर प्रकाश असलेली खिडकी होती जेणेकरून हवा आणि प्रकाश आत येऊ शकेल. या कारागृहाचे बांधकाम सन 1906 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर, भारतातील सर्वात भयानक गुन्हेगारांसह, राजकीय कैद्यांनाही येथे पाठवले जाऊ लागले.

Manipur violence : मणिपूर पुन्हा पेटलं! लोकांनी भाजपचं कार्यालयाच जाळलं

तुरुंगात कैद्यांना कशी वागणूक दिली जात होती?

काळ्या पाण्याच्या तुरूंगात रोज माणूस, लाथा बुक्क्या खावून तुरुंगाच्या खोलीत झोपलेला असायचा. अचानक मोठ्या घंटेचा आवाज व्हायचा. सूर्य उगवला नसला तरी उठणे ही सक्ती होती. नाहीतर गार्ड येऊन उचलून नेईल आणि चाबकाने मारेल ही कैद्यांमध्ये भिती होती. 700 कैद्यांसाठी तयार होण्याची वेळ फक्त एक तास निश्चित असायली. आंघोळीसाठी पाणी नाही आणि पिण्याचे जे पाणी होते त्याने तोंड धुवायलाही लोक घाबरायचे. यानंतर खाण्याची वेळ व्हायची.

हिरव्या रंगाच्या पाण्यावर तरंगणारी काही पाने भांड्यात टाकली जायची. त्यासोबत किड्यांची डाळ असायची. खाल्लं नाही तर उपाशी राहाल आणि खाल्लंच तर जुलाब होईल.

खाण्यानंतर कामाची वेळ होत असे. कामावर जातानाही त्याच्या मानेपासून पायापर्यंत बेड्या असत. अशा परिस्थितीत साफसफाईची कामे, झाडे तोडणे किंवा इतर कोणतेही मजुरीची कामे करावी लागत. मात्र, जर कुणी राजकीय कैदी असेल तर त्याच्यासाठी छळाची विशेष व्यवस्था होती. काही कामासाठी बैल नसायचे त्याच्याजागी बैलाचे काम कैद्याला करावे लागत. सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, “20 फेऱ्यांमध्ये, मजबूत माणूस चक्कर येऊन खाली पडू शकतो. त्याला दिवसभर नांगरणी करायला लावायचे.” संपूर्ण दिवसात, दिवसात एकच ब्रेक खाण्यासाठी होता. टॉयलेटसाठीही जास्त वेळ काढता येत नव्हता.

बरीन घोष त्यांच्या ‘द टेल ऑफ माय एक्साइल’ या पुस्तकात लिहितात, “एक दिवस बकुल्ला नावाच्या कैद्याला शौचालयातून परतायला उशीर झाला. सैनिकांनी त्याला इतकं मारलं की त्याच्या नितंबावरची कातडी सोलून लटकू लागली.”

जर कोणाशी बोलण्याचाही प्रयत्न केला तर असेच हाल होत असे. तुम्ही जरी इशारा दिला तरी गार्ड तुम्हाला चपला मारेल. मात्र, दिवस असा संपत नाही. क्रशर बैलाचे काम पूर्ण केल्यानंतर आणखी एक काम असायचे. नारळाच्या शेंड्यातून भुसा काढणे. त्यासाठी नारळाच्या शेंड्याला हातोडा मारावा लागायचा. एवढं करूनही जीव वाचला तर जुने दोर घासून त्याचे धागे वेगळे करावे लागायचे. हातातून रक्त यायचं.

प्रत्येक कामाचे टार्गेट ठरलेले होते. क्रशरमधून 10 लिटर तेल किंवा 20 लिटर तेल आणि नारळाचा 4 किलो भूसा. संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण केलं नाही तर त्यांना हातकड्या बांधून लटकवण्यात यायचं. पहिल्यांदा 3 दिवस, मग 10 दिवस आणि नंतरच्या वेळी गार्ड गुडघ्यांमध्ये एक काठी अडकवायचा जेणेकरून पाय पसरलेले राहायचे.

Deepak Kesarkar: ‘मला 25 कोटींची ऑफर पण…’, केसरकरांच्या वक्तव्यामुळे खळबळ

स्वातंत्र्यानंतरचे अंदमान कारागृह

अनेक स्वातंत्र्यसैनिक अंदमानमध्ये अनेक दशके असे दिवस राहिले. विनायक दामोदर सावरकर यांच्याशिवाय श्री अरबिंदो घोष यांचे भाऊ बारीन घोष. बटुकेश्वर दत्त, उल्लासकर दत्त, सचिंद्र नाथ सन्याल, भगतसिंग यांचे साथीदार आणि लाहोर षडयंत्र प्रकरणात शिक्षा झालेले, अंदमान तुरुंगात शिक्षा भोगणारे शेकडो स्वातंत्र्यसैनिक आहेत. 1932 मध्ये चितगाव शस्त्रास्त्र चोरी प्रकरणात 300 क्रांतिकारकांना येथे पाठवण्यात आले होते.
चांगल्या हक्कांसाठी या लोकांनी उपोषण सुरू केले. 44 दिवसांच्या उपोषणानंतर इंग्रजांनी त्यांच्या गळ्यात पाईप टाकून दूध ओतण्याचा प्रयत्न केला. महावीर सिंग, मोहन किशोर नामदास आणि मोहित मोईत्रा यांच्या फुफ्फुसात दूध गेले. त्यामुळे तिघांनाही न्यूमोनिया झाला आणि त्यानंतर त्यांना जीव गमवावा लागला.

इंग्रजांच्या या क्रूरतेला न जुमानता 1937 पर्यंत उपोषण सुरूच राहिले आणि मग या लोकांसाठी भारतात आवाज उठवला जाऊ लागला. 1937 मध्ये गांधी आणि टागोरांनी या विषयावर काँग्रेस कार्यकारिणीला एक तार पाठवला होता. काँग्रेसने हा मुद्दा ब्रिटीश सरकारसमोर मांडला. अनेक वाटाघाटीनंतर अखेर 1938 मध्ये सेल्युलर जेलमधील राजकीय कैद्यांना मुख्य भूभागात पाठवण्यात आले.

काळा पाणी जेलचा अध्याय इथेच संपला नाही. 1942 मध्ये जपानने अंदमानावर कब्जा केला तेव्हा त्यांनी ब्रिटीश कैद्यांना ठेवण्यासाठी सेल्युलर जेलचा वापर केला. जपानी ताब्यादरम्यान सेल्युलर जेलच्या दोन इमारती पाडण्यात आल्या. यापूर्वी 1941 च्या भूकंपात कारागृहाची मधली इमारत खराब झाली होती. त्यानंतर ते नवीन करण्यात आले. नवीन इमारत गोलाकार आकारात बांधण्यात आली होती, तर पूर्वी ती चौकोनी होती. स्वातंत्र्यानंतर तुरुंगाच्या आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या. त्याच्या जागी स्थानिक लोकांसाठी ५०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. या तुरुंगात शिक्षा भोगलेले अनेक स्वातंत्र्यसैनिक तुरुंग पाडण्याच्या विरोधात होते. त्यामुळे 1979 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी याला राष्ट्रीय स्मारक घोषित केले.

1930 मध्ये, ब्रिटिशांनी केलेल्या अमानुष अत्याचाराविरोधात कैद्यांनी उपोषण केले, त्यानंतर महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी हस्तक्षेप केला आणि ब्रिटिश सरकारसमोर हा मुद्दा मांडला गेला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT