Govt Job: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी, इच्छुकांनी लगेच करा अर्ज!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 27 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

Job Vacancy 2024 : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या भरती होत आहे. लिपिक पदासाठी 687 जागा, वाहन चालक पदासाठी 04 जागा, सुरक्षा रक्षक पदासाठी    05 जागा, जनरल मॅनेजर (संगणक) पदासाठी 01 जागा, मॅनेजर (संगणक) पदासाठी 01 जागा, डेप्युटी मॅनेजर (संगणक) पदासाठी 01 जागा तर, इंचार्ज प्रथम श्रेणी या पदासाठी 01 जागा आहे. अशा एकूण 7 पदांवर एकूण 700 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे.

ADVERTISEMENT

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 27 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे. (Govt Job opportunity recruitment 2024 Ahmednagar District Central Cooperative Bank apply now)

हेही वाचा : Mazi Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो... 'ही' एक गोष्ट केली नसेल तर 4500 रूपये विसरा!

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

हे वाचलं का?

  • पद क्र.1- 1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 2) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.2- 1) 10वी उत्तीर्ण 2) हलके वाहन चालक परवाना 3) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3-  कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी  ग्रॅज्युएट
  • पद क्र.4- 1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) 2) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.5- 1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS 2) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.6- 1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS 2) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.7- 1) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS 2) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

  • पद क्र.1, 2- 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.2- 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.3- 21 ते 45 वर्षे
  • पद क्र.4- 32 ते 45 वर्षे
  • पद क्र.5- 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.6- 30 ते 35 वर्षे
  • पद क्र.7- 28 ते 32 वर्षेवर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • पद क्रमांक 1 ते 3 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 696 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, पद क्रमांक 4 ते 7 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 885 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://adccbanknagar.org/index.php वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Delhi New CM Net Worth: ना घर, ना जमीन... तरीही करोडपती आहेत दिल्लीच्या नव्या CM अतिशी

अर्जाची लिंक

https://adccbanknagar.in/

अधिकृत जाहिरात

पद क्र.1 ते 3- https://drive.google.com/file/d/1rLEsHbktgcoV1icKlteKg3xjzqhNsy6w/view?usp=sharing 

पद क्र.4 ते 7- https://drive.google.com/file/d/1Tl9yA_47ymlCor-XGP-DpAf-348FYqQq/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT