Delhi New CM Net Worth: ना घर, ना जमीन... तरीही करोडपती आहेत दिल्लीच्या नव्या CM अतिशी
Delhi CM Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची प्रचंड चर्चा रंगली होती.
ADVERTISEMENT

Delhi CM Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची प्रचंड चर्चा रंगली होती. अशावेळी अतिशी मार्लेना यांचं नाव आज (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दोन नावांवर चर्चा सुरू होती, त्यामध्ये अतिशी यांच्या व्यतिरिक्त कैलाश गेहलोत यांचे नाव आघाडीवर होते, मात्र बैठकीत अतिशी यांचे नाव निश्चित करण्यात आले. अतिशी यांनी परदेशातून उच्च शिक्षण घेतलेलं आहे. जर त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, ना त्यांच्याकडे जमीन आहे ना दागिने आहेत तरीही त्या करोडपती कशा आहेत जाणून घेऊयात. (delhi new cm atishi to be new chief minster of delhi know about her net worth in details)
हेही वाचा : Maharashtra Breaking News : मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशी, अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रींकडे 1.41 कोटींची संपत्ती
अतिशी मार्लेना यांनी कालकाजी दक्षिण दिल्लीतून निवडणूक जिंकली होती. त्यांच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर, MyNeta वर शेअर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे 1.41 कोटी रुपयांची संपत्ती आहे, पण दिल्लीच्या करोडपती मंत्री असूनही, त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाहीये.
2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी निवडणूक आयोगासमोर मालमत्तेचा तपशील सादर केला होता. त्यांनी सांगितले होते की त्यांच्याकडे सुमारे 30,000 रुपये रोख आहेत, तर बँक ठेवी आणि एफडी एकूण 1.22 कोटी रुपये आहेत.
LIC ची फक्त एक पॉलिसी, शेअर बाजारापासून चार हात लांब...
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी यांची बहुतेक संपत्ती त्यांच्या बँक खात्यात आणि मुदत ठेवींमध्ये (फिक्स्ड डिपॉजिट) आहे. त्याचबरोबर करोडपती असूनही अतिशी शेअर बाजार किंवा बाँड मार्केटपासून चार हात लांब ठेवतात. अतिशी यांनी शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. फक्त त्यांच्या नावावर एक 5 लाख रुपयांची एलआयसी आरोग्य विमा पॉलिसी आहे.