Israel Palestine : धर्म अन् भूमी… इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्षाची कहाणी काय?
israel-palestine conflict history : इस्रायला आणि पॅलेस्टाईनमध्ये का सुरू झाला संघर्ष? इस्रायल पॅलेस्टाईनमधील वादाचा मुद्दा काय? हमास काय?
ADVERTISEMENT
Israel Palestine Conflict History in Marathi : पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्ष पेटलाय. शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलवर सुमारे 5 हजार रॉकेट डागले. रॉकेट हल्ल्यानंतर सर्वत्र विध्वंसक दृश्य आहे. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने सांगितले की, ते गाझा पट्टीमध्ये हल्ले करत आहेत, कारण हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलविरुद्ध युद्ध छेडले आहे. या घोषणेनंतर जेरुसलेममध्ये अखंड धोक्याचे सायरन वाजत आहेत. पुन्हा एकदा रक्तपात सुरू झालाय. पण, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील हा वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. (What is the Israel Palestine conflict in Marathi)
ADVERTISEMENT
इस्रायल हा ज्यूंचा देश आहे, तर पॅलेस्टाईन हा मुस्लिम बहुसंख्य असलेला देश आहे. त्यावर हमासची सत्ता आहे. हे युद्ध इस्रायलच्या स्थापनेपूर्वीपासूनच सुरू आहे. पॅलेस्टाईन आणि अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला ज्यू राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे.
यात महत्त्वाचं म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघेही जेरुसलेमला आपली राजधानी मानतात. गाझा आणि जेरुसलेमवर कब्जा मिळवण्यासाठीचा लढा या दोन देशांमध्ये शतकानुशतके सुरू आहे. इस्लामिक उदयाबरोबर शत्रुत्वाच्या तलवारी उपसल्या गेल्या असतील, पण खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला जेव्हा ऑटोमन साम्राज्य कोसळत होते.
हे वाचलं का?
जेरुसलेम दोन्ही देशांसाठी का आहे खास?
पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. त्याच वेळी, इतिहासकारांचे म्हणणे आहे की पहिल्या महायुद्धानंतर मध्यपूर्वेचे संपूर्ण चित्र बदलले. युद्धानंतर लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढू लागली. महायुद्धानंतर हा सगळा भाग ब्रिटनच्या ताब्यात आला, पण ज्यूंनी स्वतंत्र देशाची मागणी केल्यावर जेरुसलेममध्ये ज्यूंसाठी एक जागा बांधली जावी, ज्याला ज्यू त्यांचे एकमेव घर म्हणू शकतील, अशी जोरदार मागणीही करण्यात आली. .
जेरुसलेम हे इस्रायल आणि पॅलेस्टिनी लोकांचे पवित्र शहर आहे. इस्रायल-अरब तणावातही जेरुसलेम हा सर्वात वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. इस्लाम, यहुदी आणि ख्रिश्चन धर्मात या शहराला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पैगंबर इब्राहिम यांना त्यांच्या इतिहासाशी जोडणारे तिन्ही धर्म जेरुसलेमला त्यांचे पवित्र स्थान मानतात. यामुळेच या शहराचे नाव मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चनांच्या हृदयात शतकानुशतके कायम आहे.
Israel Palestine Crisis: इस्रायलमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री बेपत्ता! सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली
ज्यू आणि अरबांमध्ये विभागलेली जमीन
दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राने दोन्ही देश वेगळे करण्याचा ठराव आणला. त्यानंतर जगात प्रथमच इस्रायल अस्तित्वात आले. 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने एक ठराव संमत केला, जो मुळात फाळणीबाबत होता. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील हे क्षेत्र दोन भागात विभागले गेले होते, त्यापैकी एक अरब क्षेत्र आणि दुसरा ज्यू क्षेत्र मानला जात असे. जेथे ज्यू मोठ्या संख्येने आहेत, त्यांना इस्रायल देण्यात येईल. जिथे अरब बहुसंख्य आहेत, त्यांना पॅलेस्टाईन दिला जाईल. तिसरा जेरुसलेम होता, याबद्दल अनेक मतमतांतरे होती. येथील निम्मी लोकसंख्या ज्यू आणि निम्मी लोकसंख्या मुस्लिम होती. या भागावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण लादले जाईल, असे संयुक्त राष्ट्राने सांगितले.
ADVERTISEMENT
इस्रायलचा जन्म कधी झाला?
14 मे 1948 रोजी संयुक्त राष्ट्र आणि जगाच्या नजरेत प्रथमच इस्रायलचा जन्म झाला. या दिवशी, इतिहासातील पहिले अरब-इस्त्रायल युद्ध देखील सुरू झाले. हा लढा सुमारे वर्षभरानंतर 1949 मध्ये संपला. यामध्ये इस्रायलचा विजय झाला आणि सुमारे साडेसात लाख पॅलेस्टिनींना आपला परिसर सोडावा लागला. शेवटी ब्रिटीश राजवटीचा हा संपूर्ण भाग तीन भागात विभागला गेला. ज्याला इस्रायल, वेस्ट बँक आणि गाझा पट्टी असे नाव देण्यात आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Nobel Prize च्या जन्माची गोष्ट, कशी झाली सुरूवात; कोण होते अल्फ्रेड नोबेल?
दोन देशांमधील भूमी संघर्ष
1948 मध्ये इस्रायलच्या निर्मितीनंतर दोन्ही देशांमधील कटुता आणखी वाढली होती. या युद्धाच्या सुमारे दीड दशकानंतर एक प्रसंग आला जेव्हा इस्रायल आणि शेजारी राष्ट्रांमध्ये भीषण युद्ध झाले. हे युद्ध 6 दिवस चालले, इस्रायल जिंकला. 1948 च्या युद्धात अरब देशांनी इस्रायलकडून काही भूभाग हिसकावून घेतला होता.
हेही वाचा >> Berlin Wall History : एका रात्रीत बांधलेली बर्लिनची जगप्रसिद्ध भिंत का पाडली?
इस्रायल सूड उगवू पाहत होता, पण 1966-67 च्या युद्धात त्याला संधी मिळाली. या युद्धात इस्रायलची स्पर्धा सीरियाशी होतीच, पण सीरियाबरोबरच इजिप्त, जॉर्डन, इराक आणि लेबनॉनचाही सहभाग होता. हे युद्ध 6 दिवस चालले आणि इस्रायलने 5 देशांचा पराभव केला. या भू-युद्धाच्या शेवटी, इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टी आणि वेस्ट बँक, ज्यावर पॅलेस्टाईन आपला भाग म्हणून दावा करत आहे, त्यावरील नियंत्रण परत घेतले. इस्रायलने हा भाग ताब्यात घेतला आणि या ठिकाणी ज्यूंना वसवायला सुरुवात केली.
काय आहे अल-अक्सा मशिदीचा वाद?
इस्रायलचे जेरुसलेम हे इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांमध्ये पवित्र स्थान मानले जाते. येथील अल-अक्सा मशीद मक्का-मदीना नंतर इस्लाममधील तिसरे पवित्र स्थान मानले जाते. दुसरीकडे ज्यू देखील याला सर्वात पवित्र स्थान मानतात. 35 एकर परिसरात बांधलेल्या मशिदीला अल-हरम-अल-शरीफ असेही मुस्लिम म्हणतात. ज्यू त्याला टेंपल टाउन म्हणतात.
त्याच वेळी ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की ही तीच जागा आहे जिथे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवण्यात आले होते आणि येथेच त्याचा अवतार झाला होता. येथील चर्च म्हणजे ‘The Church of the Holy Sepulchre’. येशू ख्रिस्ताची समाधी या आत आहे. ज्यूंचे सर्वात पवित्र ठिकाण ‘डोम ऑफ द रॉक’ याच ठिकाणी आहे. पण प्रेषित मोहम्मद यांच्याशी संबंध असल्यामुळे मुस्लिमांचा डोम ऑफ द रॉकवरही विश्वास आहे. या जागेबाबत ज्यू आणि पॅलेस्टिनी यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT