Berlin Wall History : एका रात्रीत बांधलेली बर्लिनची जगप्रसिद्ध भिंत का पाडली?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

History of Germany And Berlin Wall
History of Germany And Berlin Wall
social share
google news

History of Germany And Berlin Wall : आइडा सीकमॅन नावाची 59 वर्षीय महिला नर्स म्हणून काम करत होती. ती अगदी सामान्य जीवन जगत होती. मग एक दिवस असा आला जेव्हा एका रात्री सीकमॅनला जाग आली आणि सर्व काही बदललं होतं. सीकमॅनचं घर फाळणीतील उंबरठा बनलं होतं. सीकमॅन ज्या इमारतीत राहत होती ती एका देशात होती आणि त्याचं दार दुसऱ्या देशात उघडत होतं. जरी ही व्यवस्था नवीन नव्हती पण, देशाच्या राज्यकर्त्यांनी भिंत बांधण्याची घोषणा केली होती, हे नवीन होतं. याचं कारण म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला कोणीही जाऊ शकणार नाही. (World Famous Berlin Wall History How and why did fall)

सीकमॅनचं घर अगदी बॉर्डरच्या मध्यभागी होतं. त्यामुळे त्याचे दरवाजे सील करण्यात आले होते. पलीकडे जाण्यासाठी लोक काहीही करायला तयार होते. मग एक मार्ग सापडला. काही लोक इमारतीखाली चादर पसरवून उभे राहू लागते. ज्यात उडी मारून लोक दुसऱ्या बाजूला जाऊ शकत होते. सीकमॅनचे घर चौथ्या मजल्यावर होते. उडी मारणे कठीण होते. यात तिचं वयही खूप होतं. तिने तीन दिवस वाट पाहिली. पण नंतर ती जास्त थांबू शकली नाही. पलीकडे जाण्याच्या धडपडीत तिने आपले सामान खिडकीतून फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारली. चादर पसरवली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सीकमॅनचे डोके जमिनीवर आपटले आणि तिचा मृत्यू झाला.

लोकसभा 2024 निवडणुकीपूर्वीच BJP ला दक्षिणेत झटका! AIADMK ची मोठी घोषणा

बर्लिनच्या भिंतीमुळे पडून मरण पावलेली पहिली व्यक्ती इडा सीकमॅन होती. येत्या काही वर्षांत, ही भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करताना 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आज याच बर्लिनच्या प्रसिद्ध भिंतीची गोष्ट जाणून घेऊयात. बर्लिनची भिंत का बांधली गेली? जर्मनीची फाळणी कशी झाली आणि एका छोट्याशा चुकीमुळे ही भिंत कशी पडली?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जर्मनीची फाळणी

या कहाणीची सुरूवात 1945 पासून सुरू होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. जर्मनीचे पुढे काय होणार हा मोठा प्रश्न होता. मित्रपक्षांनी मिळून एक योजना आखली. जर्मनीचे चार भाग झाले. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत रशिया या चार देशांच्या नियंत्रणाखाली ते चार भाग गेले. पुढे फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन हे मित्र झाले. पण सोव्हिएत रशिया आणि पश्चिम यांच्यात नवे शीतयुद्ध सुरू झाले. म्हणून, चार भागांमध्ये विभाजन झालेल्या जर्मनीचे व्यावहारिकदृष्ट्या दोन भागात विभाजन झाले.

ADVERTISEMENT

अशा प्रकारे दोन नवीन देश तयार झाले. एका भागाला फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी असे नाव मिळाले. त्याला वेस्ट (पश्चिम) जर्मनी असे म्हणतात. हा भाग अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनच्या ताब्यात राहिला. दुसऱ्या भागाला जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक असे नाव देण्यात आले. थोडक्यात GDR किंवा ईस्ट (पूर्व) जर्मनी असेही म्हणतात. जे सोव्हिएत रशियाच्या ताब्यात होतं. शीतयुद्धाचे दिवस होते. त्यामुळे वेस्ट जर्मनीचे भवितव्य हा अमेरिकेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न होता. त्यामुळे इथे भरपूर पैसा गुंतवला गेला. प्रचंड विकास झाला. तर ईस्ट जर्मनीची मौल्यवान मालमत्ता घेऊन मॉस्कोला पाठवली गेली. यामुळे ईस्ट जर्मनी मागे पडू लागली.

ADVERTISEMENT

पंकजा मुंडेंसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या; अमित शाहांवर ‘बाण’, काय म्हणाल्या?

सुरुवातीच्या काळात ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी यांच्यात कोणतीही निश्चित सीमा नव्हती. दोन्ही देशांचे लोक एकमेकांचे मित्र होते. त्यामुळे देवाण-घेवाण होत असायची. पण नंतर हळूहळू या येण्या-जाण्याचे स्थलांतरात रूपांतर झाले. ईस्ट जर्मनीतील लोक चांगल्या जीवनाच्या शोधात वेस्ट जर्मनीत जाऊ लागले. 1949 ते 1961 या काळात 3 दशलक्ष लोक ईस्ट जर्मनीतून वेस्ट जर्मनीत गेले. यापैकी बहुतेक ते होते जे कामगार दलाचे भाग होते. सुशिक्षित, कष्टकरी तरुण जे कामाच्या शोधात होते. त्यांच्या जाण्याने ईस्ट जर्मनीला मोठा धक्का बसला. म्हणून, 1961 मध्ये, सोव्हिएत युनियनच्या नेत्यांनी हे स्थलांतर थांबवण्याची योजना आखली.

ऑगस्ट महिन्यातील एके दिवशी जेव्हा लोक जागे झाले तेव्हा त्यांनी ईस्ट आणि वेस्ट जर्मनीच्या सीमेवर हजारो सैनिक रांगेत उभे असलेले पाहिले. ईस्ट जर्मनी ते वेस्ट जर्मनी या प्रवासावर रात्रभर बंदी घालण्यात आली. तारेचे कुंपण लावून सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली. तसंच, ईस्ट जर्मनीतील लोकांकडे वेस्ट जर्मनीत जाण्याचा मार्ग अजूनही होता.

हा मार्ग बर्लिनमधून होता. आता बर्लिनची गोष्ट जरा गुंतागुंतीची होती. बर्लिन ही पूर्वी जर्मनीची राजधानी होती. पण ती पूर्णपणे ईस्ट जर्मनीमध्ये होती. वेस्ट जर्मनी बर्लिन सोडायला तयार नव्हते. त्यामुळे बर्लिनचेही दोन भाग होतील असा करार झाला. ईस्ट बर्लिन आणि वेस्ट बर्लिन. बोलायला दोन शहरे होती पण लोक इकडून तिकडे फिरायला मोकळे होते. उर्वरित देशात हालचालींवर बंदी असतानाही हे स्वातंत्र्य अबाधित राहिले. याचा फायदा ईस्ट जर्मनीतील लोकांनी घेतला. लोक आधी ईस्ट बर्लिनला, तिथून वेस्ट बर्लिनला यायचे. वेस्ट बर्लिनहून एक ट्रेन थेट वेस्ट जर्मनीला जायला होती. त्याचा वापर करून लोक स्थलांतर करू लागले.

बर्लिनची भिंत कशी बांधली गेली?

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, सोव्हिएत सरकारने ठरवले की शहराच्या मध्यभागी एक भिंत बांधली जाईल. अशाप्रकारे बर्लिनच्या भिंतीचा पाया रचला गेला. 155 किलोमीटर लांबीच्या दोन काँक्रीटच्या भिंती एकमेकांसमोर उभारल्या गेल्या. ज्याची उंची 13 फूट होती. दोन भिंतींमध्ये 100 मीटरची जागा सोडण्यात आली होती, ज्याला जर्मन लोक डेथ ट्रॅप या नावाने ओळखत.

कारण, जर एखाद्या व्यक्तीला 13 फूट उंच भिंत पार करता आली तर त्याला ही 100 मीटर रुंद जागा पार करावी लागायची. जिथे सैनिक रात्रंदिवस प्रत्येक कोपऱ्यात पहारा देत असत. कोणालाही पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश होते. यातून जरी सुटलो तरी भूसुरुंग घातले होते आणि ट्रिप वायर्स बसवण्यात आल्या होत्या, त्यांना स्पर्श करताच मशीन गनच्या गोळ्या आपोआप सुटायच्या. हा मृत्यूचा सापळा ओलांडणे जवळजवळ अशक्य होते. पण तरीही अनेक लोक होते ज्यांना ही भिंत थांबवू शकली नाही.

1961 ते 1989 या काळात ही भिंत ओलांडण्याचे एक लाखाहून अधिक प्रयत्न झाले.20 वर्षांत 5000 हून अधिक लोकांनी बर्लिनची भिंत ओलांडण्यात यश मिळविले. तर 150 हून अधिक लोक होते ज्यांचा भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला.

या वर्षांत अनेकवेळा ही भिंत पाडण्याची मागणी करण्यात आली. पण सोव्हिएत युनियन तयार नव्हते. 1987 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी बर्लिनमध्ये प्रसिद्ध भाषण दिले होते. ज्यात ते म्हणाले होते, “मिस्टर गोर्बाचेव्ह, कृपया ही भिंत पाडा.” त्या वेळी, रेगनच्या मागणीचा फारसा परिणाम झाला नाही, परंतु लवकरच परिस्थिती अशी बनली की लोकांनी स्वतःच भिंत पाडली.

‘बाकीच्या कारखान्यांना मदत, माझ्या…’, पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील खदखद

बर्लिनची भिंत कशी पाडण्यात आली?

90 च्या दशकापर्यंत सोव्हिएत युनियन अडचणीत आले होते. सोव्हिएत युनियनचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांना नवीन सुधारणा आणायच्या होत्या. त्यामुळे सोव्हिएत युनियनच्या अनेक देशांमध्ये बंडखोरी सुरू झाली. दुसरी घटना 1989 मध्ये घडली. ऑस्ट्रिया आणि हंगेरीने त्यांच्या सीमा एकमेकांना खुल्या केल्या. दोघेही वेगवेगळ्या कॅम्पमध्ये होते. हंगेरी सोव्हिएत छावणीत होता आणि ते ईस्ट जर्मनीच्या अगदी शेजारी स्थित होते. त्यामुळे झाले असे की, ईस्ट जर्मनीतील लोक हंगेरीमार्गे ऑस्ट्रियामध्ये येऊ लागले. आणि आधी सांगितल्याप्रमाणे ऑस्ट्रिया दुसऱ्या छावणीत असल्यामुळे इथून लोक वेस्ट जर्मनीला जाऊ शकत होते.

चेकोस्लोव्हाकियामध्येही अशीच परिस्थिती होती. चेकोस्लोव्हाकियामार्गेही स्थलांतर सुरू झाले होते. त्यामुळे ईस्ट जर्मनी आणि सोव्हिएत सरकार दबावाखाली होते. लोक रस्त्यावर आले होते आणि बाहेर जाण्यासाठी घोषणा करत होते.

तोपर्यंत बर्लिनच्या भिंतीत काही चेक पॉइंट होते. ज्यातून पार जाता येत असे. मात्र त्यासाठी विशेष पास आवश्यक होता. पास देखील फक्त विशेष परिस्थितीत उपलब्ध होता. लोकांना नियमांमध्ये शिथिलता हवी होती. त्यामुळे लोकांचा राग शांत करण्यासाठी पूर्व जर्मन सरकारने एक समिती स्थापन केली. जेणेकरुन त्यांना अधिक पासेस देण्याचे मार्ग शोधता येतील. या समितीने काही नवीन नियम केले आणि सरकारच्या ताब्यात दिले. नवीन नियम टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार होते. मात्र त्यांची अंमलबजावणी करताना एक छोटीशी चूक झाली.

9 नोव्हेंबर 1989 ही ऐतिहासिक तारीख आहे. कारण त्यादिवशी, पूर्व जर्मन सराकारचे नेते गंथर स्काबोव्स्की यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवीन नियम जाहीर करण्यात येणार होते. पत्रकार परिषदेच्या काही मिनिटांपूर्वी स्काबोव्स्की यांना एक नोट मिळाली. ज्यामध्ये नवीन नियम आणि इतर गोष्टी लिहिल्या होत्या. चूक अशी होती की त्यांनी संपूर्ण दस्तऐवज वाचला नाही आणि जाहीर केले की ईस्ट जर्मनीचे लोक आता सहज पार करू शकतील. सर्वांना सहज पास मिळेल. हा नियम दुसऱ्या दिवसापासून लागू होणार होता. आणि त्यासाठी पासपोर्ट मिळणं आवश्यक होतं. पण जेव्हा एका पत्रकाराने स्काबोव्स्कीला विचारलं की, नवीन नियम कधी लागू होतील. ते म्हणाले, ‘आजपासून आणि आतापासून.’

NCP Split : ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

मग काय, जगभरातील टीव्हीने ही बातमी दाखवायला सुरुवात केली. ही बातमी ईस्ट जर्मनीत रात्री साडेदहा वाजता प्रसारित होताच. भिंतीजवळ हजारो लोक जमले. आणि त्यांना पलीकडे जाण्याची परवानगी द्यावी, अशी सुरक्षारक्षकांकडून मागणी करू लागले. पासशिवाय जाण्याची परवानगी नाही हे रक्षकांना माहीत होते. पण गर्दी इतकी मोठी होती की, पहारेकरी काहीच करू शकले नाहीत. दरवाजे उघडले गेले. हजारो लोकांनी एका वर्षांनंतर वेस्ट जर्मनीत पाऊल ठेवले. तिथे उत्सवासारखे वातावरण होते. त्यादिवशी हे स्पष्ट झाले की, भिंत अजूनही उभी असली तरी आता त्याचा काही अर्थ नव्हता.

बर्लिनची भिंत पाडणे ही 20 व्या शतकातील सर्वात मोठी घटना मानली जाते. कारण या दिवसापासून सोव्हिएत युनियनची उलटी गिनतीही सुरू झाली. या घटनेवर प्रसिद्ध राजकीय विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा म्हणाले, “इतिहास संपला”.

बर्लिनची भिंत पडल्यानंतर 11 महिन्यांनी ईस्ट आणि वेस्ट जर्मनी विलीन झाले. काही काळानंतर सोव्हिएत युनियनचेही विघटन झाले. तसंच, बर्लिनची भिंत पडण्याची तारीख 9 नोव्हेंबर 1989 मानली जाते. मात्र अधिकृतपणे भिंत पाडण्याचे काम 1990 मध्ये सुरू झाले. लोकांनी हातोडा आणि कुऱ्हाड उचलून स्वतः भिंत पाडण्यास सुरुवात केली. या 100 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या भिंतीचा बहुतांश मलबा इतर बांधकामांमध्ये वापरण्यात आला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT