PM Modi Exclusive Interview: ...अन् पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले!
पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले!
social share
google news

PM Modi Video: वाराणसी: लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (14 मे) उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याआधी 'आज तक'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आईची वाढत काढताच पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले. (pm modi exclusive interview lok sabha election 2024 narendra modi who went to varanasi to file his candidature form before that he is very emotional with memories of his mother)

ADVERTISEMENT

पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलताना भावुक झाले..

'मला जेव्हा माझ्या पक्षाने इथे पहिल्यांदा निवडणूक लढविण्यासाठी पाठवलं तेव्हा माझ्या मनात आलं की, माँ गंगेने मला बोलावलं आहे.. पण मागील 10 वर्षातील माझं जे येथील नातं राहिलं.. ते म्हणजे माझं जे जुनं विश्व होतं त्याने मला पुन्हा जोडलं (लिंक केलं).. मी पुन्हा एका गंगेच्या कुशीत सामावून गेलो..' 

हे ही वाचा>> भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरले, पण भुजबळांनी केली 'सुटका'

'यामुळेच माझा असा नेहमी भाव आहे की, माँ गंगेने मला दत्तक घेतलंय. माझ्या आईच्या निधनानंतर माझी ही भावना अधिक तीव्र झाली आहे.. माझ्या कणाकणात.. माझ्या भावविश्वात माँ गंगेने जी पोकळी आली होती ती पोकळी भरून काढली.' 

हे वाचलं का?

(पंतप्रधान मोदी भावुक)  'मला असं वाटतं की माझी जबाबदारी खूप वाढली आहे. कुटुंबातील छोट्यातील छोट्या व्यक्ती समान पद्धतीने भाव व्यक्त करतो तेव्हा मला वाटतं की, पहिलं.. माझ्याकडून कोणती चूक होऊ नये..' (मोदींना अश्रू अनावर) 

'दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मनात असा भाव असतो की, असू शकतं की माझ्या आईने मला जन्म दिलाय..' 

'ते पाहा.. याला काय म्हणाल आपण.. (गंगा घाटावर जमलेल्या लोकांकडे हात दाखवून) हे भाजप नाहीए.. तेव्हा मला वाटतं की, परमात्माने स्वत: मला काही कामासाठी मला पाठवलं आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Devendra Fadnavis : "आमची चूक झाली", उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

'परमात्माने भारत भूमी निवडली, मला निवडलं.. एक प्रकारे साऱ्या बंधनातून विरक्त होऊन प्रत्येक काम हे परमात्म्याचं काम आहे, ईश्वराची आराधना समजून करतो.' 

ADVERTISEMENT

'माझ्या शरीराचा एक-एक कण हा फक्त आणि फक्त माँ भारतीसाठी आहे.. 140 देशवासियांसाठी आहे.' अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT