लोकसभा 2024 निवडणुकीपूर्वीच BJP ला दक्षिणेत झटका! AIADMK ची मोठी घोषणा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

AIADMK announces break of alliance with bjp
AIADMK announces break of alliance with bjp
social share
google news

Aiadmk-bjp alliance News In Marathi : एकीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय बेरजेचं राजकारण करण्यात गुंतलेत. प्रादेशिक पक्षांना सोबत घेत राजकीय बळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच दक्षिणेत कमकुवत असलेल्या भाजपला मोठा झटका बसलाय. अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडली आहे. आता हा पक्ष एनडीएचा घटकपक्ष राहिलेला नाही. पक्षाकडून याची घोषणा करण्यात आल्यानंतर AIADMK समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. AIADMK ने पत्रकार परिषदेत भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णादुराई आणि जयललिता यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केल्याचे पक्षाने म्हटले आहे. (AIADMK has broken the alliance with BJP. Now this party is not a part of NDA.)

AIADMK ने सोमवारी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि सांगितले की ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष वेगळ्या आघाडीचे नेतृत्व करेल.

ईपीएस यांच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय

AIADMK मुख्यालयात पक्षाचे प्रमुख एडप्पाडी के पलानीस्वामी (EPS) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेबद्दल पत्रकारांना माहिती देताना माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते केपी मुनुसामी म्हणाले की, पक्षाने एकमताने एनडीएपासून दूर जाण्याचा आणि पुढील वर्षीच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘जयललिता यांचा झाला अपमान’

कोणाचेही नाव न घेता, ठरावात असे म्हटले आहे की भाजपचे राज्यातील नेतृत्व द्रविडियन दिग्गज दिवंगत सीएन अन्नादुराई आणि दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची बदनामी करत आहे आणि अण्णाद्रमुकच्या धोरणांवर टीका करत आहे.

हेही वाचा >> ‘ऐ @#%$…’ भाजप खासदाराची लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ

दुसरीकडे, अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की द्रविडीयन पक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्यावर नाराज आहे. त्यांनी अण्णादुराईंबद्दल केलेल्या विधानावरून मित्रपक्षांमध्ये तेढ निर्माण झाली होती.

ADVERTISEMENT

आघाडीतून बाहेर पडल्यानंतर अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट

AIADMK बैठकीला पक्षाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा सचिव आणि आमदार आणि खासदार उपस्थित होते. येथील पक्षाच्या मुख्यालयात फटाके फोडले जात असताना, मुनसामी म्हणाले की, एकमताने घेतलेला निर्णय दोन कोटींहून अधिक पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना आणि आकांक्षांचा आदर करतो.

ADVERTISEMENT

भाजपच्या तामिळनाडू प्रमुखांनी कोणतेही वक्तव्य केले नाही

एआयएडीएमकेने भाजप आणि एनडीएसोबतची युती तोडल्यानंतर तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले, ‘मी तुमच्याशी नंतर बोलेन, मी प्रवासादरम्यान बोलत नाही. मी नंतर बोलेन.’

हेही वाचा >> शिंदे अपात्र झाल्यास भाजपचा प्लॅन बी काय? समजून घ्या 4 मुद्द्यांत

तेजस्वी यादव काय बोलले?

एआयएडीएमकेने भाजप आणि एनडीएसोबतची युती तोडल्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, “हा त्यांचा विषय आहे. यावर मी फार काही बोलू शकणार नाही. तामिळनाडूत द्रमुक खूप मजबूत आहे. तिथं काँग्रेस आणि द्रमुकची आघाडी खूप मजबूत आहे. काही दिवसांपूर्वी एनडीएची बैठक झाली पण त्यात कोणताही निर्णय झाला नाही. कोणताही अजेंडा नव्हता. दक्षिण भारतावर नजर टाकली तर लक्षात येईल की एनडीएचा एक मोठा सहयोगी पक्ष आघाडी सोडून गेला आहे. यामुळे भाजपचे मोठे नुकसान होईल, असे मला वाटते. शिवसेना, जेडीयू आणि अकाली दल यांनी आधीच युती सोडली आहे. यावरून एनडीए आता अर्थहीन असल्याचे स्पष्ट होते. तिथे एकच हुकूमशहा बसला आहे आणि दोन लोक देश चालवत आहेत.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT