Lok Sabha : 'पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंचं रडगाणं', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize udhhav thackeray on slow voting lok sabha election 2024 mumbai lok sabha
ठाकरेंच्या या टीकेचा समाचार आता देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे.
social share
google news

Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : 'मोदी सरकार पराभवाच्या भितीने निवडणूक आयोगाचा वापर घरगाड्या सारखा करत असल्याची' टीका शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली होती. ठाकरेंच्या या टीकेचा समाचार आता देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. उद्धव ठाकरेंना पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच त्यांचे रडगाणे सुरु असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे. (devendra fadnavis criticize udhhav thackeray on slow voting lok sabha election 2024 mumbai lok sabha) 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. पण आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, असा हल्ला फडणवीसांनी ठाकरेंवर चढवला. 

हे ही वाचा : "तावडेंना तिकीट दिलं होतं, पण...", फडणवीसांनी सांगितली सगळी स्टोरी

माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असे आवाहन देखील फडणवीसांनी मतदारांना केले आहे. 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

मुंबईत संथ गतीने सुरु असलेल्या मतदानावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी मतदार केंद्रात दिरंगाई करताय. नावे दोनदा तपासली जातायत. ज्येष्ठ मतदारांना त्रास होतोय. कसलीही सोय करण्यात आली नाही आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, असा आरोप ठाकरेंनी केला होता. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगाड्या सारखा करतोय. पक्षपातीपणा करतोय, असा हल्ला ठाकरेंनी भाजपवर चढवला. 

हे ही वाचा : पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या आरोपीला 'निबंध' लिहीण्याच्या शिक्षेसह कोणत्या अटींवर जामीन?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT