Pune: दोघांना चिरडणाऱ्या आरोपीला कोर्टाने सांगितलं 'निबंध' लिहायला; आणखी अटी कोणत्या?
Pune Crime News : सध्या पुण्यातील थरकाप उडवणाऱ्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. दारुच्या नशेत कार चालवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दोन जणांना उडवलं. यामध्ये 25 वर्षीय अश्विनी कोष्टा हीचा जागीच मृत्यू झाला तर, 27 वर्षीय अनिष दुधिया याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दोन जणांना चिरडल्यानंतरही, 14 तासांच्या आत जामीन
'या' 4 अटींवर न्यायालयाने दिली जामीन
आरोपीचा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मिळाला जामीन
Accident News of Pune : सध्या पुण्यातील (Pune) थरकाप उडवणाऱ्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. दारुच्या नशेत कार चालवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दोन जणांना उडवलं. यामध्ये 25 वर्षीय अश्विनी कोष्टा हीचा जागीच मृत्यू झाला तर, 27 वर्षीय अनिष दुधिया याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते दोघंही इंजिनीअर होते. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती, मात्र काही तासांतच त्याला कोर्टातून जामीन मिळाला. त्याचबरोबर, न्यायालयाकडून त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा मिळाली. (pune accident case porsche car took lives two engineers Court gave punishment to accused write an essay over incident What are the other conditions)
ADVERTISEMENT
आरोपी तरूण हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. अनिष दुधिया आणि अश्विनी कोष्टा अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. हा अपघात शनिवारी (18 मे) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे जमलेल्या जमावाने त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा: "तावडेंना तिकीट दिलं होतं, पण...", फडणवीसांनी सांगितली सगळी स्टोरी
दोन जणांना चिरडल्यानंतरही, 14 तासांच्या आत जामीन
या हायप्रोफाईल कार अपघातातील आरोपीला जिल्हा न्यायालयाने 14 तासांच्या आत जामीन मंजूर केला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पुण्यातील बाल न्यायालयात हजर करण्यात आलं.
हे वाचलं का?
'या' 4 अटींवर न्यायालयाने दिली जामीन
- आरोपीला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसह वाहतूक पोलिसांना मदत करावी लागेल.
- आरोपीला मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घ्यावे लागतील.
- आरोपीला भविष्यात कोणतीही दुर्घटना दिसली तर त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
- शिक्षा म्हणून, न्यायालयाने आरोपीला 'रस्ते अपघातांचे परिणाम आणि त्याचे उपाय' या विषयावर किमान 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: 'त्यांना खोलीतून सोडू नका, पहाटेचे 5 वाजले तरी...', ठाकरे संतापले!
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेले दोघंही राजस्थानचे रहिवासी होते आणि ते जवळच्या पबमधून पार्टी करून परतत होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "मी रिक्षा घेऊन उभा होतो. मुलगा आणि मुलगी बाईकवर होते आणि रस्ता ओलांडत असताना अचानक एका पोर्श कारने भरधाव वेगात येऊन दोघांना उडवले. कारच्या धडकेत तरूणी हवेत 10 फूट फेकली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरूण एका गाडीवर आदळल्याने त्याच्या बरगड्या तुटल्या आणि यामुळे त्याला हालचालही करता येत नव्हती."
हेही वाचा: मुंबईत संथ गतीने मतदान, निवडणूक आयोगावर दिरंगाईचा आरोप
आरोपीचा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मिळाला जामीन
अल्पवयीन आरोपी विरुद्ध IPC कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याची रक्त तपासणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. या प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 3, 5, 199-अ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT