Mumbai Voting: 'अधिकाऱ्यांना खोलीतून सोडू नका, पहाटेचे 5 वाजले तरी...', ठाकरे प्रचंड संतापले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Udddhav Thackeray Mumbai Voting: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या फेरीतील मतदान आज (20 मे) पार पडत आहे. पण मतदानादरम्यानच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजपवर तुफान टीका केली आहे. (lok sabha election 2024 due to the slow voting process in mumbai uddhav thackeray made serious allegations against election commission and bjp)

मुंबईतील अनेक भागांमधील मतदारसंघांमध्ये मागील काही तासांपासून प्रचंड धीम्या गतीने मतदान सुरू आहे. त्यामुळे बराच मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला हा प्रकार काही मतदान केंद्राबाबतच समोर आल होता. मात्र, थोड्याच वेळात मुंबईतील अनेक मतदार केंद्रांवर अशाच स्वरूपाच्या रांगा लागल्या असल्याचं समोर आलं.

हे ही वाचा>> ''बिल्डरपुत्राला जामीनासाठी रेड कार्पेट, पोलिस ठाण्यात बिर्याणी, पिझ्झा पार्टी...'',

त्यानंतर या घटनेचं गांभीर्य ओळखून उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब हे बाहेर पडलं आणि त्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाऊन मतदार केंद्राची पाहाणी केली. एवढंच नव्हे तर तेथील मतदानाचा वेग वाढविण्यात यावा यासाठी प्रयत्नही केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर उद्दव ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेत या सगळ्या घटनेवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. तसंच या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. पण याचवेळी त्यांनी मतदारांना आवाहनही केलं की, कितीही उशीर झाला तरी रांग सोडू नका. 

धीम्या मतदान प्रक्रियेवर संतापले उद्धव ठाकरे, पाहा नेमकं काय म्हणाले... 

'महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा एक-दीड तासात थांबेल. मी माहिती घेतोय. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदारांची गर्दी दिसतेय. पंरतू निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसत आहे. निवडणूक आयोगाचे तथाकथित प्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांमध्ये दोन-तीन वेळा नावे तपासली जात आहे.'

ADVERTISEMENT

'मतदारांसाठी कुठलीही सोय केलेली नाही. पिण्याचे पाणीही नाही. रांगेत असलेल्या मतदारांना आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ लागतोय. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतोय. याबद्दल मी नागरिकांना आवाहन करतो की, मतदान करा.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'वायकरांनी अटक टाळण्यासाठी उमेदवारी घेतली', शिंदेंच्याच नेत्याने टाकला बॉम्ब

'जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत. कितीही वेळ झाला तरी रांग सोडू नका. पहाटे पाच-सहा वाजले तरी सोडू नका. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. कुठल्याही मतदारसंघातील जी केंद्र आहेत, जिथे तुम्हाला विलंब केला जात आहे. त्याची नोंद तिथल्या शिवसेना शाखेत करा. निवडणूक प्रतिनिधींची नावे विचारा. आपल्याला न्यायालयात दाद घेता येईल. त्यांची नावे आली, तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती जाहीर करेन.' 

'तुम्ही मतदानाला उतरू नये म्हणून मोदी सरकारचा डाव आहे. तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसं होईल हे ते बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रात उभे रहा. जे लोक उभे असतील, त्यांनी मतदान केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटे पाच वाजले तरी. जे अधिकारी विलंब लावताहेत. कारण नसताना छळत आहेत. तुमच्या ओळखपत्रावरून जो वेळ काढत आहेत. तर मतदान केल्याशिवाय त्यांना बाहेर पडू देऊ नका. ज्या भागात आम्हाला मतदान अधिक होतं, त्या भागातून आम्हाला या तक्रारी मिळत आहेत.'

'मला तर स्पष्ट दिसतंय की, हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच, घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करतंय की काय? असं म्हणायला जरूर वाव आहे. मी उघड सांगतो की, जिथे शिवसेनेला मतं पडतायेत तिथे हा विलंब लावला जातोय.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT