Pune Accident : ''बिल्डरपुत्राला जामीनासाठी रेड कार्पेट, पोलिस ठाण्यात बिर्याणी, पिझ्झा पार्टी...'', अपघाताच्या घटनेवर धंगेकरांचा गंभीर आरोप

प्रशांत गोमाणे

Ravindra Dhangekar on Pune Accident : पुण्यातील अपघाताच्या घटनेवरून रविंद्र धंगेकर प्रचंड चिडले आहेत. यापुढे कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही, यासाठी कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील अपघाताच्या घटनेवर रविंद्र धंगेकर प्रचंड आक्रमक झाले आहेत.
pune accident news ravindra dhangekar big allegation against yerwada police agrawal builder lok sabha 2024
social share
google news

Ravindra Dhangekar on Pune Accident : पुण्याच्या कल्याणी नगर भागात मंद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवणाऱ्या एका बिल्डराच्या पोराने (Builder boy) रविवारी दोघांना उडवल्याची घटना घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की मृत दोघेजण दुरवर फेकले गेले होते आणि रस्त्यावर आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर 14 तासांत अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. या जामीनावरून आता आश्चर्य व्यक्त होतं आहे. असे असताना आता पुण्याच्या या अपघाताच्या घटनेवर रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  प्रचंड आक्रमक झाले आहेत. धंगेकर यांनी एक्सवर भली मोठी पोस्ट टाकून आता कारवाईची मागणी केली आहे. (pune accident news ravindra dhangekar big allegation against yerwada police agrawal builder lok sabha 2024) 

रविंद्र धंगेकर यांनी पैशाव्याल्यांची औलाद अशी मस्ती करणार असेल त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहेत. यासोबत येरवडा पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. 

रविंद्र धंगेरकरांची पोस्ट जशीच्या तशी 

कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही. 

या घटनेतील दोषी : 

हे वाचलं का?

    follow whatsapp