Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म, लगेच मिळणार 4500 रुपये?

मुंबई तक

Mazi Ladki Bahin Yojana New Form Online Process : माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे.

ADVERTISEMENT

ladki Bahin Yojana New Form Online Proces
ladki Bahin Yojana New Form Online Proces
social share
google news

बातम्या हायलाइट

point

...तर तुम्हालाही मिळतील लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा?

point

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Mazi Ladki Bahin Yojana New Form Online Process : माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. परंतु, ज्या महिलांनी अर्ज भरला नाही, त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे. नवीन अर्ज व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.

अशाप्रकारे तुम्ही नवीन अर्ज भरू शकता

ladkibahin.maharashtra.go.in या पेजला भेट द्यायची आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, 1 कोटींहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या पोर्टलवर 84 लाखांहून अधिक अर्ज मंजूर झालेले आहेत. . सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज कसा भरायचा, हे तुम्हाला सांगणार आहोत.
अर्ज कसा करायचा?

अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. नवीन असल्यास खाते तयार करा, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप करा. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा. ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

हे ही वाचा >> Optical Illusion : भल्या भल्यांना नाही जमलं! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला साप

आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हिलेडटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत टाईप करायचं आहे. वडिलांचे नाव कॉलममध्ये लिहियाचं. विवाहित असल्यास पतीचं नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत भरायचं आहे. वैवाहिक स्थितीमध्येही विकल्प निवडून इंग्रजीत माहिती भरा. आधारकार्ड प्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होयवर क्लिक करा. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या राज्यात जन्म झाला आहे त्याच्यावर क्लिक करा आणि कागदपत्र अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे नमूद करा. पिनकोड भरा. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका सिलेक्ट करा. जो मतदारसंघ असेल, तो सिलेक्ट करा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक भरून टाका.

हे वाचलं का?

    follow whatsapp