Wrong UPI MoneyTransfer : गुगल पे, फोन पेद्वारे चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर काय करायचं?

रोहिणी ठोंबरे

UPI च्या माध्यमातून मोबाईलवरून कोणालाही काही सेकंदातच पैसे ट्रान्सफर करता येतात. पण, काहीवेळा असं होतं की, UPI ट्रान्झॅक्शन करताना तुमच्याकडून चुकीच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, मग अशा वेळी तुम्ही काय कराल? यासाठी काही सोप्या पद्धती आहेत ज्यांचा तुम्हाला पैसे परत मिळवण्यास फायदा होईल.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

UPI Wrong Payment Transaction : UPI सुरू झाल्यापासून भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Transaction) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जेव्हा पैसे ट्रान्सफर करणे किंवा पेमेंट करण्याची वेळ येते तेव्हा बरेच लोक त्याचा वापर करतात. पैसे घेणे किंवा पाठवणे हे यूपीआयमुळे सोपं काम झालं आहे. UPI च्या माध्यमातून मोबाईलवरून कोणालाही काही सेकंदातच पैसे ट्रान्सफर करता येतात. या सुविधेमुळे त्याचा वापरही झपाट्याने वाढला आहे. (How to Recover Money Transferred in wrong Account by UPI)

पण, काहीवेळा असं होतं की, UPI ट्रान्झॅक्शन करताना तुमच्याकडून चुकीच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, मग अशा वेळी तुम्ही काय कराल? यासाठी काही सोप्या पद्धती आहेत ज्यांचा तुम्हाला पैसे परत मिळवण्यास फायदा होईल. UPI ट्रान्झॅक्शन ही एक अतिशय जलद प्रक्रिया आहे आणि एकदा पैसे प्रोसेस झाल्‍यानंतर तुम्‍ही ते रिव्‍हर्स करू शकत नाही. तसंच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) या समस्येवर तोडगा म्हणून ” UPI ऑटो-रिव्हर्सल” सिस्टम लागू केली आहे. यावरून तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्याची रिक्वेस्ट करू शकतात.

India Alliance : ‘या’ 13 गोष्टी ठरवणार ‘इंडिया’चं भवितव्य, आता खरी कसोटी!

चुकून झालेलं ट्रान्झॅक्शन कसं करता येणार रिव्हर्स?

जेव्हा UPI ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही कोणत्या विशिष्ट अटींनुसार ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करण्याची रिक्वेस्ट करू शकता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम, तुम्ही चुकीच्या UPI आयडी किंवा मोबाईल नंबरवर पैसे पाठवले असल्यास, तुम्ही ते परत करण्याची रिक्वेस्ट करू शकता. दुसरं म्हणजे, जेव्हा एखादं न केलेलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला अकाउंटमध्ये दिसल्यास, तत्काळ तुमच्या बँक किंवा UPI सर्व्हिस प्रोव्हायडरला त्याची तक्रार करणं महत्त्वाचं आहे. नंतर, तुम्ही केवळ त्या UPI ट्रान्झॅक्शनला रिव्हर्स करू शकता जे पेंडिंग आहे किंवा अयशस्वी झाले आहे. यशस्वी ट्रान्झॅक्शनला रिव्हर्स करता येत नाही.

ट्रान्झॅक्शन करण्यापूर्वी डिटेल्स तपासा

हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, एकदा ट्रान्झॅक्शन यशस्वी झालं की ते परत करता येत नाही. त्यामुळे, कोणत्याही चुका टाळण्यासाठी UPI व्यवहार करण्यापूर्वी डिटेल्स नीट तपासा. लक्षात ठेवा की UPI वापरताना, ट्रान्झॅक्शनच्या नोंदी ठेवा, सतर्क राहा तुमचा UPI पिन सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्राप्तकर्त्याचे डिटेल्स दोनदा तपासा.

हे वाचलं का?

    follow whatsapp