Personal Finance: पगार वाढल्यानंतरही तुम्ही 'ही' गोष्ट नाही केली तर...

रोहित गोळे

Salary Increment: पगारवाढीनंतर नियोजन न करता खर्च करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. 10 लाख वार्षिक पगार मिळवणाऱ्या रोशनप्रमाणे तुम्ही वाढलेल्या उत्पन्नाचा योग्य वापर कसा करावा हे जाणून घ्या?

ADVERTISEMENT

personal finance if you do not do this smart planning after getting increment then you will have to regret it
Personal Finance
social share
google news

Personal Finance Tips for Salary Increment and investment: जुने आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपले आणि नवीन 1 एप्रिलपासून सुरू होताच कंपन्यांमध्ये अप्रेझल फॉर्म भरले गेले. त्यानंतर प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीनुसार पगारवाढीस सुरुवात झाली. तर काहींना याचा एरिअर  देखील खात्यात जमा होऊ लागला आहे, परंतु जर तुम्ही वाढलेल्या याच पगाराचं नियोजन न करता खर्च करायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप होऊ शकतो.

महिन्याच्या 25 तारखेपर्यंत बँक खाते रिकामे होईल. क्रेडिट कार्ड किंवा मित्रांकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया थांबणार नाही. मग तुम्ही स्वतः म्हणाल... पगार वाढला आहे पण खर्च नियंत्रित होत नाही. पर्सनल फायनान्सच्या या सीरिजमध्ये, आम्ही तुम्हाला वेतनवाढीनंतर स्मार्ट नियोजनाबद्दल माहिती देणार आहोत, जेणेकरून वाढलेला पगार तुमचे भविष्य सुरक्षित करेलच, शिवाय तुमचा विश्वासू भागीदारही बनेल.

रोशनाच पगार दरवर्षीसाठी 10 लाख रुपये आहे. त्याला त्याच्या कंपनीत 15 टक्के वेतनवाढ मिळाली आहे. म्हणजेच रोशनचा पगार हा 11 लाख 50 हजार आहे. आता रोशनला दरमहा सुमारे 11000 रुपये जास्त मिळतील. रौनकने या पैशांचे काय करावे? त्याच्यासाठी टॉप 5 प्राधान्यक्रम काय असतील?

वाढलेला पगार कसा मॅनेज करायचा?

जर तुमचा पगार अलिकडेच वाढला असेल, तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन, पण वाढ झाल्यानंतर पहिला प्रश्न येतो की, या वाढलेल्या उत्पन्नाचे काय करायचे? जर वाढीनंतरही पगार वार्षिक 12 लाखांपेक्षा कमी असेल, तर कराबाबत कोणते स्मार्ट नियोजन करावे?

पगार वाढला की खर्चही वाढतो, पण जर तुम्हाला असे वाटत असेल की हे पैसे तुमचे भविष्य मजबूत करू शकतील, तर तुम्ही पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp