How To Select A Jeans : महिलांनो! कशी खरेदी करायची 'परफेक्ट जीन्स'? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षातच ठेवा
Perfect Shape Jeans : आजच्या ट्रेंडी आणि फॅशनेबल काळात जीन्स सर्वात कम्फरटेबल आऊटफीट बनलं आहे. मुलांप्रमाणेच मुलीही जीन्स घालणं खूप पसंत करतात. जीन्स तेव्हा चांगली दिसते, जेव्हा ती योग्य शेप आणि फिटिंगमध्ये असते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'या' आहेत परफेक्ट जीन्स खरेदी करण्याच्या जबरदस्त टीप्स
परफेक्ट जीन्स खरेदी करताना 'या' गोष्टींचा नक्कीच विचार करा
जीन्स खरेदी करताना बॉडी टाईप जाणून घ्या
Perfect Shape Jeans : आजच्या ट्रेंडी आणि फॅशनेबल काळात जीन्स सर्वात कम्फरटेबल आऊटफीट बनलं आहे. मुलांप्रमाणेच मुलीही जीन्स घालणं खूप पसंत करतात. जीन्स तेव्हा चांगली दिसते, जेव्हा ती योग्य शेप आणि फिटिंगमध्ये असते. मुलींसाठी परफेक्ट जीन्स अनेक गोष्टींवर डिपेंड करते. ज्यामध्ये बॉडी टाईप, स्टाईल आणि कम्फर्टसारख्या गोष्टी सामील असतात. बेस्ट जीन्स निवडण्यासाठी काय करावं, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
बॉडी टाईप जाणून घ्या
जीन्स खरेदी करताना मुलींना त्यांचं बॉडी टाईप जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला योग्य जीन्स खरेदी करता येईल.
अॅप्पल शेप (Apple Shape) : जर तुमचं वजन तुमच्या मिडसेक्शनच्या जवळपास असेल, तर हाय वेस्ट जीन्स पाहा. जी तुमच्या कंबरेला हायलाईट करेलं.
नाशपाती शेप (Pear Shape) : मजबूत हिप्स आणि मांड्यांसाठी बूटकट किंवा स्ट्रेट लेग जीन्स पायांपर्यंत लांब करून तुमच्या शेपला बॅलेन्स करू शकते.










