Ram Mandir : राम मंदिरासाठी तुम्हीही दिली असेल देणगी तर करात मिळेल सूट! नेमकी प्रक्रिया काय?
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला असून सर्वत्र रामाचा जयघोष होत आहे. बजेटही लवकरच येणार आहे. जर तुम्हालाही रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी द्यायची असेल, तर तुम्ही यावर कर सवलतीचा लाभही घेऊ शकता.
ADVERTISEMENT
Ram Mandir Donation Process : ज्या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो दिवस आला. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला असून सर्वत्र रामाचा जयघोष होत आहे. बजेटही लवकरच येणार आहे. जर तुम्हालाही रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी द्यायची असेल, तर तुम्ही यावर कर सवलतीचा लाभही घेऊ शकता. (If you have donated for Ram Mandir you will get tax exemption What exactly is the process)
ADVERTISEMENT
करात कशी मिळणार सूट?
सरकारच्या आयकर कायदा 1961 च्या कलम 80G अंतर्गत राम मंदिराच्या जीर्णोद्धार किंवा दुरुस्तीसाठी दान केलेल्या रकमेच्या 50% रकमेवर आयकर सूट घेऊ शकता. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटनुसार, केंद्र सरकारने 2020-2021 या आर्थिक वर्षापासून “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र” (PAN: AAZTS6197B) हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण म्हणून अधिसूचित केले आहे.
वाचा : Maratha Reservation : जरांगेंची मुख्यमंत्र्यांना चर्चेची विनंती, CM शिंदे म्हणाले, ‘माझे अधिकारी…’
श्री रामजन्मभूमी तीर्थ परिसरातील मंदिराच्या पुनर्बांधणी/दुरुस्तीसाठी जी काही देणगी दिली जाईल. त्यातील 50 टक्के आयकर कायदा, 1961 च्या कलम 80G अंतर्गत अटींच्या अधीन राहून कलम 80G (2) (b) अंतर्गत डिडक्शनसाठी पात्र असतील. 2000 रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेवर कर कपात करण्याची परवानगी नाही.
हे वाचलं का?
ट्रस्टला देणगी देण्यावर 50 टक्के सवलत आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 1 लाख रुपये दान केले. यापैकी तुम्ही ५० हजार रुपयांवर कर सूट मागू शकता. म्हणजे ही रक्कम संपूर्ण रकमेतून उणे असेल. मात्र, यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना देणगीची पावती द्यावी लागेल.
वाचा : जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, पोलिसांनी बजावलेल्या ‘त्या’ नोटीसमध्ये काय?
दान कसे करता येणार?
- श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राची अधिकृत वेबसाइट https://online.srjbtkshetra.org/#/login देणगी देण्यासाठी विविध पर्याय देते.
- देणगी देण्यासाठी, तुम्ही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दान (डोनेशन) विभागावर क्लिक करू शकता.
- मोबाइल OTP वापरून लॉग इन करता येते.
- आता नाव, देणगीचा उद्देश, पॅन नंबर, देणगीची रक्कम, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरा.
- देणगीची पावती त्वरित तयार केली जाते आणि देणगीदार ती डाउनलोड करू शकतात.
- पेमेंट गेटवे, UPI, NEFT, IMPS, डिमांड ड्राफ्ट आणि चेक पेमेंट यासह विविध देणगी पद्धतींच्या मदतीने देणगी देऊ शकता.
वाचा : Maratha Reservation : जरांगेंनी सरकारचा आदेश धुडकावला, भगवं वादळ मुंबईच्या दिशेने
श्री राम ट्रस्टला दान केलेल्या रकमेसाठी कलम 80G अंतर्गत होते कपात
- देणगी केवळ मंदिराच्या जीर्णोद्धार/दुरुस्तीसाठी द्यावी
- देणगीदारांनी देणगीची पावती घेणे आवश्यक आहे.
- दान केलेली रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त नसावी.
- 10% पेक्षा जास्त रक्कम कर कपातीसाठी पात्र असणार नाही.
कर कपातीसाठी देणगीची पावती असणे आवश्यक आहे. - याशिवाय 2000 रुपयांपेक्षा जास्त रोख देणगी देखील कर सवलतीसाठी पात्र असणार नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT