Job Selection Tips: ...तरच तुमचं जॉब सिलेक्शन पक्क! कंपनीत CV पाठवण्याची योग्य वेळ कोणती?

मुंबई तक

Best Time To Send A Resume:  कोणत्याही नोकरीसाठी सीव्ही किंवा रेज्युमेची आवश्यकता असते. या कागदपत्रांच्या आधारावरच कंपनी तुम्हाला पुढील प्रोसेस, परीक्षा किंवा थेट मुलाखतीला बोलावते.

ADVERTISEMENT

What Is The Best Time To Send A Resume
What Is The Best Time To Send A Resume
google news

बातम्या हायलाइट

point

कंपनीत जॉब मिळण्यासाठी कधी पाठवावा रेज्युमे?

point

CV पाठवण्याआधी 'या' गोष्टी लक्षातच ठेवा

point

सकाळ की संध्याकाळ? सीव्ही पाठवण्याची योग्य वेळ कोणती?

Best Time To Send A Resume:  कोणत्याही नोकरीसाठी सीव्ही किंवा रेज्युमेची आवश्यकता असते. या कागदपत्रांच्या आधारावरच कंपनी तुम्हाला पुढील प्रोसेस, परीक्षा किंवा थेट मुलाखतीला बोलावते. अनेकदा सीव्ही चांगला असूनही उमेदवारांची निवड केली जात नाही. त्यामुळे सीव्ही पाठवण्याची वेळही योग्य असली पाहिजे. सीव्ही पाठवण्याची योग्य वेळ कोणती? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

CV पाठवण्याआधी 'या' गोष्टी लक्षातच ठेवा

नोकरीसाठी कुठेही अप्लाय करण्याआधी एक योग्य सीव्ही तयार करणं गरजेचं असतं. कोणत्याही नोकरीत सिलेक्शन होण्यासाठी सीव्हीचा कंटेट खूप महत्त्वाचा मानला जातो. सीव्ही पाठवणे एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. सीव्ही पाठवण्याची वेळ तेवढीच महत्त्वाची असते, जेवढं त्याचं कंटेट असतं. योग्य वेळी सीव्ही पाठवल्याने तुमच्या सिलेक्शनच्या संधी वाढतात.

हे ही वाचा >> Eknath Shinde: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी सुरु होणार मेट्रो-3? उपमुख्यमंत्री शिंदेचं मोठं विधान

सीव्ही पाठवण्याची योग्य वेळ कोणती?

सीव्ही कधी पाठवला पाहिजे? सकाळी की संध्याकाळी?, असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला सीव्ही पाठवायच्या कार्यालयाच्या टायमिंगची माहिती घ्यावी लागेल. जर कार्यालयाची वेळ 9 ते 6 असेल, तर ऑफिस सुरु होण्याच्या एक तास आधी सीव्ही पाठवल्यावर सिलेक्शनच्या संधी वाढतात. कारण तुमचा सीव्ही सर्वात पुढे असेल. यामुळे एचआरचं लक्ष तुमच्या सीव्हीवर सर्वात आधी पडेल.

हे ही वाचा >> Suresh Dhas Parbhani : अजितदादा क्या हुआ ते वादा? बीडमधील परिस्थिती सांगत सुरेश धस यांचा तुफान हल्लाबोल

सायंकाळी सीव्ही पाठवणंही योग्य

जर तुम्ही सायंकाळी सीव्ही पाठवत असाल, तर तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. यावेळी अनेक लोकांनी त्यांचं दिवसभरातील काम संपवलेलं असतं आणि घरी जाण्याआधी एकदा इमेल नक्की चेक करतात. तसच दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर आधीचे इमेल चेक करून कामाला सुरुवात करतात. एका जॉब सर्चिंग वेबसाईट Indeed नुसार, वीकेंडला पाठवल्याला सीव्हीलाही खूप महत्त्व दिलं जातं. जर तुम्हाला नोकरीसाठी एखाद्या संस्थेत सीव्ही पाठवायचा असेल, तर रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी पाठवा. यामुळे सिलेक्शनच्या संधी वाढतात.

हे वाचलं का?