Ladki Bahin Yojana : 1500 की 3000 रूपये...नेमके किती पैसे तुमच्या खात्यात डिपॉझिट होणार?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात (Women Account) पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सूरूवात
महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात
तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात (Women Account) पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यात (Bank Account) किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana 1500 rs or 3000 rs how many rupees deposit on your account dbt trajsfer mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis)
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज हे 31 ऑगस्ट आधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. आता यामध्ये ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले होते. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.
हे ही वाचा : Crime: सिनेस्टाईलने नर्सचा खून! 2 सरकारी कर्मचारी गजाआड, कारण जाणून धक्काच बसेल
3000 कुणाला मिळणार?
ज्या महिलांचा अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाला नाव्हता त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसेच आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या वाटेचे 3000 रूपये बाकी होते. आता या महिलांनी 31 ऑगस्टआधी आपला अर्ज मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात 3000 जमा होणार आहेत. अशाप्रकारे ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये पैसे आले नव्हते. त्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.
'या' महिला 3000 गमावणार
1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Jaydeep Apte: 'ठरलं होतं, तसं घडलं...' जयदीप आपटेला पोलिसांनी शोधलं नाही, तर... वाचा Inside Story
तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT