Ladki Bahin Yojana Form: लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होणार की नाही?, छाननी सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana how to checke your application in accepted or rejected and pending ajit pawar eknath shinde read full details
लाडकी बहीण योजनेत तुमच्या अर्जाची स्थिती काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

योजनेत तुम्ही केलेल्या अर्जाच स्टेटस काय?

point

तुम्ही केलेला अर्ज मंजूर होणार की नामंजूर?

point

'या' पद्धतीने तुम्हाला अर्जाच स्टेटस तपासण्यात येणार आहे?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या योजनेत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज (Women Application) केला आहे.या महिलांना आता पात्रता यादीची (Eligibility list) प्रतिक्षा लागली आहे.पण तुम्ही केलेला अर्ज राज्य सरकारने मंजूर (Accepted) केला आहे की नामंजूर (Rejected) केला आहे?  हे नेमके कसे तपासायचे हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana how to checke your application in accepted or rejected and pending ajit pawar eknath shinde read full details) 

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तो सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर स्टेटस In Pending To Submitted असे येते.जर तुम्हालाही अर्ज केल्यानंतर स्क्रीनवर In Pending To Submitted असा पर्याय दिसत असेल तर, तुमचा अर्ज हा सबमिट झाला आहे आणि आता अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करत आहे.त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर तो मंजूर झाल्याचे कळेल. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे का, कुठे पाहता येणार यादी?

अर्जाचं स्टेटस कसे तपासाल? 

तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला In Pending To Submitted शिवाय आणखी दोन पर्यात दिसत आहेत. त्यात एक SMS Verification Done असा पर्याय आहे. याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे.दुसरा पर्याय हा Edit चा देण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात दुरूस्ती करू शकता.यासोबत तुम्हाला या ठिकाणी आणखी एक पर्याय या ठिकाणी देण्यात आला आहे. इंग्रजीबद्दल i हे चिन्ह असलेला पर्याय तुम्हाला दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस मिळणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अर्ज भरल्यानंतर मिळतात तीन पर्याय 

तुम्ही तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय मिळतात. पहिला पर्याय मंजूर (Approved), नामंजूर (Rejected) आणि प्रलंबित (Pending )

मंजूर 

जेव्हा तुम्ही तुमचा अर्ज व्यवस्थित भरला असाल आणि तुमची कागदपत्र देखील योग्य असल्यास तुम्हाला मंजूर अशी स्थिती दिसेल. 

ADVERTISEMENT

नामंजूर  

अर्जदाराने सरकारने दिलेले निकष पाळले नसेल आणि चुकीचा अर्ज भरला असेल तर तुमचा अर्ज नामंजूर होईल. 

ADVERTISEMENT

प्रलंबित 

तुम्हाला जर अजूनही पेंडीगचा पर्याय येत असेल तर अजूनही अधिकारी तुमचा अर्ज तपासत आहेत.त्यामुळे तुम्हाला पेंडीगचा पर्याय येतो.

हे ही वाचा : Vishal Patil : विशाल पाटलांचं लोकसभेत घणाघाती भाषण; म्हणाले,''17 खासदारांना तरी...''

खात्यात पैसै कधी जमा होणार? 

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 
 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT