Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांची लॉटरीच लागली, अर्जही मंजूर आणि 'इतके' पैसे मिळणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme these women big lottery in shcheme mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar
महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सूरूवात होणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सूरूवात

point

तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार

point

तुमच्या खात्यात पैसे आले का?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे (Third Installment) पैसे जमा व्हायला सूरूवात होणार आहे. आजपासून सलग तीन दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची प्रतिक्षा संपणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे यायचे बाकी आहेत, त्या महिलांनी आजपासून बँक खातं (Bank Account) तपासायला सुरूवात करा. या महिलांच्या खात्यात एकीकडे पैसे येणार असताना त्या महिलांची तर लॉटरीच लागणार आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme these women big lottery in shcheme mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)  

खरं तर लाडकी बहीण योजनेची मुदत सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टआधी अर्ज न करता आलेल्या महिलांना या मुदत वाढीने दिलासा मिळाला होता. या दिलास्यानंतर महिलांसाठी आणखीण एक गुडन्यूज आली होती. ती म्हणजे, 'ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत',अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे या महिलांचा अर्ज त्याच महिन्यात मंजूर होणार आणि त्याच महिन्यात त्यांना पैसे देखील मिळणार आहेत. 

हे ही वाचा : Vishwakarma Yojana : 'लाडकी बहीण'नंतर लखपती व्हायची सुवर्णसंधी, काय आहे 'ही' योजना?

पण 3000 चा फटका बसणार? 

1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले होते. त्यामुळे या महिलांना 3000 रूपयाचा फटका बसला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'इतक्या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ 

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवसापासून 4500 थेट खात्यात येणार?

''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT