Vishwakarma Yojana : 'लाडकी बहीण'नंतर लखपती व्हायची सुवर्णसंधी, काय आहे 'ही' योजना?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm vishwakarma news yojana how to get benefit of these scheme how to apply what document required pm narendra modi read full article
पीएम विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीएस विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे?

point

या योजनेत कोण पात्र ठरणार?

point

योजनेत कसा भरायचा अर्ज?

How To Apply For Pm Vishwakarma Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज वर्ध्यात येऊन पीएम विश्वकर्मा योजनेच्या (Pm Vishwakarma Yojana) वर्षपूर्ती कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गेल्या 17 सप्टेंबरला महाराष्टात येऊन मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेला आता वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी 18 प्रकारच्या व्यवसायातील 18 लाभार्थ्यांना डिबेंचर्सचे वितरण केले आहे. दरम्यान ही पीएम विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे? या योजनेसाठी कोण पात्र ठरणार? कसा अर्ज करायचा आहे? हे जाणून घेऊयात. (pm vishwakarma news yojana how to get benefit of these scheme how to apply what document required pm narendra modi read full article)

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त वर्ध्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, आज आपण पीएम विश्वकर्मा योजनेचे यश साजरे करत आहोत. हजारो वर्षांचे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचे हरवलेले वैभव परत मिळवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.विश्वकर्मा योजना हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही. भारताचे कौशल्य जिवंत ठेवण्याचा हा रोडमॅप असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

नेमकी योजना काय? 

देशातील 140 हून अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे कारागिरांना कमी व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेत 17 हून अधिक कारागीर आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : PM Modi: PM मोदींची थेट मराठीतून टीका, म्हणाले.. 'काँग्रेसला तर गणपती पुजेबाबतही..'

अर्जदाराला 'इतकं' लोन मिळणार? 

पीएम विश्वकर्मा योजनेत तुम्हाला अनेक फायद्यांसोबतच कर्जाची सुविधा देखील मिळते. यामध्ये तुम्ही एकूण 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. हा लाभ फक्त त्यांनाच मिळतो जे या योजनेचे लाभार्थी आहेत. याशिवाय योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करणारे लाभार्थी 1 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र मानले जातात. ज्यांनी पहिला हप्ता घेतला आहे आणि मानक कर्ज खाते राखले आहे त्यांना 2 लाख रुपयांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध आहे.

लोनच्या परतफेडीचा कालावधी काय? 

या योजनेसाठी जे पात्र ठरले आहेत, त्यांना प्रथम 1 लाख रूपयापर्यंत कर्ज घेता येते. या कर्जाची तुम्हाला 18 महिन्यांत परतफेड करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला 2 लाख रूपयाचे कर्ज घेता येणार आहे. या कर्जाची परतफेड तुम्हाला 30 महिन्याच्या कालावधीत करायची आहे. यासाठी तुम्हाला ५ टक्के सवलतीचे व्याज द्यावे लागेल. तथापि, हे तुम्हाला कोणत्याही तारण न देता दिले आहेत.

ADVERTISEMENT

कोण ठरणार पात्र ? 

  • अर्जदार भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे. 
  • पीएम विश्वकर्मा योजनेत विश्वकर्मा समाजातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आला आहे.
  • योजनेचा लाभ फक्त कारागिरांनाच दिला जातो.
  • केवळ कुशल कारागीर आणि कारागीर या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही आयकर भरू नये.

'ही' कागदपत्रे गरजेची 

पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज करणाऱ्या अर्जदारांजवळ आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवसापासून 4500 थेट खात्यात येणार?

योजनेत अर्ज कसा करायचा? 

कॉम्प्युटरवर पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा. 

वेबसाईट ओपन केल्यावर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करायचे आहे. 

नवीन पेज उघडल्यावर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरायचा आहे. 

त्यानंतर ओटीपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. 

तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचे आहे. 

नंतर तूमचा आधार नंबर टाकून फिंगरप्रिट ऑथेंटीफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

ऑथेंटीफिकेशन पुर्ण  झाल्यावर स्क्रिनवर अर्ज उघडणार आहे. 

अर्जात विचारण्यात आलेली सर्व माहिती नीट भरा.

आवश्यक कागदपत्रे  नीट स्कॅन करून ती अपलोड करा. 

शेवटी फायनल सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला पावती मिळणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT