एग्जिट पोल

PM Modi: PM मोदींची थेट मराठीतून टीका, म्हणाले.. 'काँग्रेसला तर गणपती पुजेबाबतही..'

मुंबई तक

ADVERTISEMENT

PM मोदींची थेट मराठीतून टीका
PM मोदींची थेट मराठीतून टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणपती पुजेबाबत काँग्रेसला चीड असल्याची मोदींची टीकाही

point

वर्ध्यातील सभेतून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर आगपाखड

point

मराठीतून केली मोदींनी काँग्रेसवर टीका

Ganpati Puja and PM Modi: वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपती पूजा केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण आता याच टीका मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'काँग्रेस पक्षाला गणपती पुजेबाबतही चीड आहे.' असं म्हणत मोदींनी आता काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. ते आज (20 सप्टेंबर) वर्ध्यातील जाहीर सभेत बोलत होते. (congress hates ganpati puja criticism of pm modi in marathi in public meeting wardha)

पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेल्याच जेव्हा समोर आलं तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. लोकशाहीच्या दृष्टीने ही भेट योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. यावरून काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला होता. ज्याला आज मोदींनी महाराष्ट्रातून उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर 'महाराष्ट्र गणपतीची आराधना करीत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती.' असं मराठीतून म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

वर्ध्यात नेमकं काय म्हणाले PM मोदी 

'ज्या पक्षामध्ये आमची आस्था आणि संस्कृतीचा जरा जरी सन्मान असेल तर ते गणपती पुजेला विरोध करू शकत नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पुजेबाबत द्वेष आहे. महाराष्ट्र साक्ष आहे की, स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणपती उत्सव भारताच्या एकतेचा उत्सव बनला होता.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> CJI DY Chandrachud: सरन्यायाधीशांच्या घरी PM मोदी, गणपती बाप्पांची केली खास आरती!

'गणेशोत्सवात प्रत्येक समाज, प्रत्येक वर्गातील लोकं एकत्र यायची. त्यामुळे काँग्रेस पक्षाला गणपती पुजेबाबतही चीड आहे.' 

'मी गणेश पूजन कार्यक्रमात गेलो तर काँग्रेसच्या तुष्टीकरणचं भूत जागं झालं. काँग्रेस गणपती पुजेला विरोध करू लागली. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करू लागली. कर्नाटकात तर काँग्रेस सरकारने गणपती बाप्पालाच तुरुंगात टाकलं.' 

'गणपतीच्या ज्या मूर्तीची लोकं पूजा करत होते ती मूर्तीच पोलीस व्हॅनमध्ये कैद केली. महाराष्ट्र गणपतीची आराधना करीत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> PM Modi and CJI Chandrachud: 'फक्त PM मोदींनाच नाही तर...', 'त्या' भेटीबाबत नवी माहिती आली समोर

'संपूर्ण देश गणपतीचा हा अपमान पाहून आक्रोश व्यक्त करत आहे. मी हैराण आहे की, काँग्रेसचे सहयोगींच्या तोंडालाही कुलूप लागलं आहे. त्यांच्यावरही काँग्रेसच्या संगतीचा असा परिणाम झाला आहे की, गणपतीचा जो अपमान झाला त्याचा विरोध करण्याची हिंमत राहिलेली नाही.' अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT