Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 'या' तारखेपर्यंत 4500 खात्यात होणार जमा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme third installment amout 4500 deposite women account mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde
महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता खात्यात जमा व्हायला सूरूवात

point

महिलांच्या खात्यात 4500 आले

point

तुमच्या खात्यात पैसे आले का?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. 29 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती देण्यात आली होती. मात्र त्याआधीच 25 सप्टेंबरला पैसे हस्तांतरणास सूरूवात झाली होती. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला होता.  त्यात आता आज आदिती तटकरेंनी महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे महिलांच्या खात्यात आणखीन दोन दिवसात पैसे येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (ladki bahin yojana scheme third installment amout 4500 deposite women account mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)  

राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार  25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, महिलांना मिळाला दिलासा

तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांच्या तिसरा हप्ता देण्यात आला आहे. आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत. त्या महिलांना देखील आदिती तटकरे यांनी दिलासा दिला आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीयेत, त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 
 
 ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले आहेत. पण तिसऱ्या हप्त्याचे पैसे त्याच्या खात्यात जमाच झाले नाहीयेत. अशा महिलांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत पैसा जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : फक्त 'याच' 'महिलांच्या खात्यात 4500 डिपॉझिट, यादीत तुमचं नाव आहे का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT