Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात 50 लाख 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार लाभ, तुमचं नाव आहे का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana second term 50 lakhs women get benefit of mukhyamantri ladki bahin yajana scheme installment amount deposite on saptember month aditi tatkare eknath shinde
दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव असणार आहे का?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार

point

1 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्यांना लाभ मिळणार

point

31 ऑगस्टनंतर योजनेचे पैसे वितरीत होणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना या योजनेचे लाभ मिळणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव असणार आहे का? चला जाणून घेऊयात.(ladki bahin yojana second term 50 lakhs women get benefit of mukhyamantri ladki bahin yajana scheme installment amount deposite on saptember month aditi tatkare eknath shinde) 

ADVERTISEMENT

लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पहिल्या टप्प्यात जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहे. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत. हे जाणून घेऊयात. 

'या' तारखेनंतर खात्यात पैसे जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Badlapur News: 'CM ने काय आता शाळांवर पहारा द्यायचा...', शिंदेंच्या 'या' आमदाराला नेमकं झालंय तरी काय?

दरम्यान या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. या दरम्यान ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. अजूनही 4 दिवस बाकी आहेत. या दिवसात अनेक अर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अनेक महिलांना लाभ मिळणार आहे.  

अर्जाची युद्ध पातळीवर पडताळणी सूरू

31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत. सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.

ADVERTISEMENT

त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj : धक्कादायक! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 9 महिन्यांपूर्वी PM मोदींनी केलेलं अनावरण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT