Badlapur News: 'CM ने काय आता शाळांवर पहारा द्यायचा...', शिंदेंच्या 'या' आमदाराला नेमकं झालंय तरी काय?
Sanjay Gaikwad on Badlapur Incident : बदलापूरच्या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले होते. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मोठं विधान केले आहे. ''आता हे सगळं सरकार सरकार करतंय, मग मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांमध्ये पाहारा द्यायचा का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सगळे पक्ष त्यात थयथयाट करतायत
मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांमध्ये पाहारा द्यायचा का?
संजय गायकवाडांचं मोठं विधान
Sanjay Gaikwad on Badlapur Incident : जका खान, बुलढाणा : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले होते. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मोठं विधान केले आहे. ''आता हे सगळं सरकार सरकार करतंय, मग मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांमध्ये पाहारा द्यायचा का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला होता. गायकवाड यांच्या या विधानावरून आता मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. (sanjay gaikwad on badlapur school rape case reaction on opposition criticm dipak keskar badlapur news)
ADVERTISEMENT
बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर पत्रकारांनी संजय गायकवाड यांना प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, ''काल मी आंदोलन पाहिलं, सगळे पक्ष त्यात थयथयाट करत होते. आता हे सगळे लोकं सरकार सरकार करतायत, पण मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पाहारा देणारा महाराष्ट्राच्या की एसपी त्याच्या घरी जाऊन बसणार आहेत की आरोपी सांगतो चल ये मी बलात्कार करतोय ये मला पकडायला अस सांगतो का?''. या घटना घडत असतात त्याच्यासाठी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा काम करते, पोलिसांकडून नाही झालं तर सीबीआयवाले करतात. सीबीआयकडून नाही झालं तर एसआयटीवाले करतात, पण आरोपीला सोडत नाही.त्यामुळे अशा घटनांचे राजकारण करण्यापेक्षा या नराधमांना शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. ते प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसत नाही, अशी खंत देखील संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! 'या' दिवशी महिलांच्या खात्यात 4500 होणार डिपॉझिट
चौकशी अहवालात काय?
दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चौकशी अहवालातील अनेक खुलासे केले. शाळेतील सीसीटीव्हीचे 15 दिवसाचे रेकॉर्ड गायब असल्याचा खुलासा यावेळी दिपक केसरकर यांनी केला होता.
हे वाचलं का?
तसेच शाळेत लहान मुलांसाठी दोन सेविका देखील होत्या. कामिनी गायकर आणि निर्मला घुरे अशी त्यांची नावे होती. या दोन महिलांकडे चिमुकल्यांना बाथरूममध्ये नेण्याची आणि त्यांना पुन्हा वर्गात बसवण्याची जबाबदारी होती. पण या दोन महिला चौकशीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांना काहीही सांगायचे नाही असे गृहीत धरून आम्ही अहवाल पुढे पाठवला आहे. या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून करावं असे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
दिपक केसरकर पुढे म्हणाले, ही घटना 13 ताखेरला घडली होती आणि 14 तारखेला मुलीच्या आजी आजोबांनी क्सासटीचर दिपाली देशपांडे आणि मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असताना कारवाई केली नाही,असे दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Aaditya Thackeray: "वामन म्हात्रेंना..."; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आदित्य ठाकरे संतापले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT