Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! 'या' दिवशी महिलांच्या खात्यात 4500 होणार डिपॉझिट
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरण लवकरच होणार

निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार

45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पडला आहे. असे असतानाच आता या संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे, याची नेमकी तारीख सांगितली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. (ladki bahin yojana scheme on these date tha ladki bahin yojana second part installment deposit mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)
लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहे. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत. हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Crime News : 'डिअर अहो, बाय'; काळीज पिळवटून टाकणारी 'सुसाईड नोट'! डॉक्टरची पतीमुळे आत्महत्या?
दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.