Crime News : 'डिअर अहो, बाय'; काळीज पिळवटून टाकणारी 'सुसाईड नोट'! डॉक्टरची पतीमुळे आत्महत्या?
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर पत्नीने गळफास घेतला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने गळफास घेतला.
काळीज पिळवटून टाकणारी 7 पानी 'सुसाईड नोट'
आत्महत्येपूर्वी प्रतिक्षा गवारेने चिठ्ठीत नेमकं काय म्हटलं?
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर पत्नीने गळफास घेतला आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या विवाहितेचे नाव आहे. पती प्रीतम हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता, माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीने आपले आयुष्य संपवण्यचे टोकाचे पाऊल उचलले. (chhatrapati sambhajinagar Crime news mbbs dr pratiksha gavare did suicide due to husband harassment wrote 7 pages sucide note)
ADVERTISEMENT
महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करून घरी बोलावले मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता. याप्रकरणी प्रतिक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिक्षाने सात पानी चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने तिचा नवरा तिला कशाप्रकारे त्रास देत होता. त्यामुळे प्रतिक्षाची मानसिक स्थिती बिघडल्याचेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. तसंच, पती आपल्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता, याबद्दलही सांगितले आहे.
हेही वाचा : Aaditya Thackeray: "वामन म्हात्रेंना..."; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आदित्य ठाकरे संतापले
प्रतीक्षा एमबीबीएस होती. मार्च महिन्यातच तिचा कुटुंबाच्या संमतीने नात्यातील प्रीतम गवारे (27) याच्यासोबत विवाह झाला. महिन्याभरापूर्वीच प्रतिक्षाला MGM मध्ये नोकरी लागली होती. सध्या तिचे प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू झाले होते. पण, शनिवारी (24 ऑगस्ट ) दुपारी 1 वाजता ती घरी परतली. त्यानंतर पतीला मेसेज करून थेट गळफास घेतला. राखीपौर्णिमेवरून घरी परतलेल्या प्रीतमला (पती) पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. रूग्णवाहिका बोलावून एमजीएममध्ये तिला दाखल करून तो पसार झाला.
हे वाचलं का?
'तुमच्यासाठी आई-वडील, मित्र-मैत्रिणी सगळं सोडलं तरी...'; आत्महत्येपूर्वी प्रतिक्षाने चिठ्ठीत नेमकं काय म्हटलं?
"डिअर अहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जिवापाड केलं. स्वत:ला विसरुन गेले तुमच्यासाठी... माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही, एका स्वावलंबी मुलीला dpendent बनवलं. खूप स्वप्न घेऊन लग्न केले होतं तुमच्याशी. हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल... तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी... गोंडस बाळ असतं आपलं तर आज ही वेळ आणलीत तुम्ही माझ्यावर.
तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी... मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी, भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा, म्हणून त्यांनाही बोलत नव्हते जास्त. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला... नंबर बदलण्यासाठी वाद घातले, त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे doubts काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात. पण देवाशप्पथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहील... माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
ADVERTISEMENT
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं.
ADVERTISEMENT
तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण, सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन...
हेही वाचा : Vasantrao Chavan Passed Away: महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! खासदार वसंत चव्हाण यांचं निधन
मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल, माझी कदर केली नाही Atlist दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा. मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो, नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT