Ladki Bahin Yojana Status Check 2024: 3000 मिळणार की नाही? 2 मिनिटांत समजेल, फक्त...

मुंबई तक

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स
माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 दरमहा

point

राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी केले अर्ज

point

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स कसं तपासाल?

Ladki Bahin Yojana Status Check: मुंबई: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

ADVERTISEMENT

या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तुम्हीही अर्ज केला असेल आणि या योजनेचं स्टेट्स तपासायचं असेल, तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स नेमकं कसं तपासता येईल याविषयी आपल्याला माहिती देणार आहोत.

 

हे वाचलं का?

Ladki Bahin Yojana Status Check 2024

 

योजनेचं नाव

माझी लाडकी बहीण योजना

ADVERTISEMENT

कोणी सुरू केली?

महाराष्ट्र सरकार

ADVERTISEMENT

लाभार्थी

राज्यातील गरीब महिलांसाठी

लाभ

पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन/ऑफलाइन

नारी शक्ती दूत App

https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en

अधिकृत वेबसाइट

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

 

माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्रातील अनेक महिला आजही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलेला दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

या रकमेतून महिला आवश्यक गरजा पूर्ण करू शकते. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या योजनेचं स्टेट्स ऑनलाइन तपासू शकता.

माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट

https://ladakibahin.maharashtra.gov.in

नारी शक्ती दूत ॲपवरून (Nari Shakti Doot App) लाडकी बहीण योजनेचं स्टेट्स तपासा

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअरमध्ये नारी शक्ती दूत ॲप शोधा आणि हे ॲप डाउनलोड करा.

2. आता मोबाइलमध्ये नारी शक्ती दूत ॲप उघडा.

 

 

3. आता मोबाईल नंबर टाका आणि Accept terms & condition वर टिक करा आणि Login बटणावर क्लिक करा.

 

4. लॉगिन बटणावर क्लिक केल्यावर, तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.

5. हा OTP बरोबर टाका.

6. या पेजवर सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा आणि अपडेट बटणावर क्लिक करा.

 

 

7. आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवरील प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करा.

 

 

8. आता एक नवीन पेज उघडेल, अर्ज विकल्प पर्यायावर क्लिक करा.

9. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये अर्ज क्रमांक टाका.

10. आता तुम्हाला अर्जाचं स्टेट्स दिसेल.

अशा प्रकारे तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून स्टेट्स तपासू शकता.

Ladki Bahin Yojana Status वेबसाइटवरून असं तपासा

 

1. या योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा. तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

 

 

2. वेबसाइटच्या होम पेजच्या मेनू बारमधील अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करा.

3. अर्जदाराच्या लॉगिनवर क्लिक केल्यावर लॉगिन पेज उघडेल.

 

 

4. त्यात मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.

5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

6. आता बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला स्टेट्स दिसेल.

 

 

 

7. यामध्ये तुम्ही आय बटणावर क्लिक करून अर्जदाराची सर्व माहिती पाहू शकता.

 

 

अशा प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून स्थिती तपासू शकता.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT