Weight Loss: आळशी लोकांसाठी चांगली बातमी.. कमी मेहनतीचं काम केलं तरी घटतं वजन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

lazy people even if you do less hard work, you lose weight
lazy people even if you do less hard work, you lose weight
social share
google news

Weight Loss: कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वजन वाढले की, ते वजन कमी करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांकडून (Health Experts) चालणे, धावणे किंवा व्यायाम (Running or exercising) करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जर तुम्ही आळशी (lazy) असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देत आहोत. संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की, बसण्याऐवजी तुम्ही असंही काही करु शकता ज्यामुळे तुमचे वजन अगदी नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे हे संशोधन नेमकं आहे काय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लठ्ठपणा आणि घातक आजार

ज्यांची लाईफस्टाईल बैठी आहे, त्यांना लठ्ठपणा आणि इतर अनेक घातक आजारांना सामोरे जावे लागत असते असं संशोधनातून सिद्ध झाले आहे. आतापर्यंत असंही मानले जात होते की, केवळ व्यायाम, पोहणे, सायकलिंग याद्वारेच फक्त वजन कमी केले जाऊ शकते. मात्र आता जर्नल युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार झोपेसारख्या गोष्टीतूनह तुमचे वजन कमी केले जाऊ शकते. कारण संशोधकांच्या मते, दररोज 30 मिनिटे बसण्याऐवजी तेवढाच वेळ झोपल्याने शरीराचे वजन आणि तुमच्या कंबरेची घेरीही कमी होत असते. उभे राहणे आणि चालणे याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. परंतु संशोधकांनी व्यायाम आणि शारीरिक हालचालींच्या जागी कमी त्रासाच्या गोष्टी केल्यामुळेही तुमचे वजन कमी होणारे असते.

हे ही वाचा>>  Cabbage tapeworm : कोबीमुळे मेंदूत किडे घुसतात? डॉक्टरांनी सांगितलं तरी काय?

मानसिक आरोग्याचाही परिणाम

याबाबत ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आले आहे की, आर्थिक समस्यांमुळेही पालकांचा ताण वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये दम्याची लक्षणे वाढत असलेली दिसून येतात. हे निष्कर्ष 14 वर्षांच्या कालावधीत 3 हजार 900 मुलांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर सांगण्यात आले आहे. धूम्रपान, प्रदूषण आणि ऍलर्जीमुळे दम्याची लक्षणे उद्भवतात असे सामान्यतः मानले जाते मात्र त्याचवेळी मानसिक आरोग्याचीही कारणं सांगण्यात आली आहेत. या गोष्टींचाही तुमच्या वजनावर परिणाम होत असतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फूड ॲलर्जीचाही मोठा धोका

एका नवीन अभ्यासानुसार, दूध आणि शेंगदाण्यामुळे होणाऱ्या फूड ऍलर्जीमुळे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो, आणि त्यामुळे तुमचा मृत्यूही होऊ शकतो. हा धोका अशा लोकांना देखील होऊ शकतो ज्यांना अॅलर्जीची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. जर्नल ऑफ ऍलर्जी आणि क्लिनिकल इम्युनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, अॅलर्जीमुळे हृदयविकाराचा धोका धूम्रपान, मधुमेह आणि संधिवात इत्यादींमुळे हृदयाच्या आरोग्यास धोका असतो. 5,374 लोकांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हे ही वाचा>> ‘या’ नवऱ्यांच्या मनात दुसऱ्या महिलांचा कधीच येत नाही विचार, बायका स्वतःला समजतात भाग्यवान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT