Manoj Jarange : अन्न-पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? मृत्यू होऊ शकतो का?
मनोज जरांगे पाटील उपोषण : माणूस अन्न आणि पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो? आमरण उपोषण केल्यामुळे माणसाच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात? कोणता धोका असतो?
ADVERTISEMENT

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे यांनी आधी अन्नाचा त्याग केला, नंतर काही काळ पाणीही सोडले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होतेय. पण, अन्नाशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? किंवा अन्न आणि पाणी या दोन्हींशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? यावर शास्त्रज्ञ सतत काम करत आहेत. एक अंदाज असा आहे की लोक पाण्याशिवाय 2 दिवस ते एक आठवडा जगू शकतात.
इतरही काही कारणं आहेत जे माणूस पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो, हे ठरवतात. जसं की, गरम कारमध्ये अडकलेले किंवा अति उष्णतेमध्ये व्यायाम करणारे लोक काही तासांत डिहायड्रेट (शरीरातील पाणी कमी होणे) होऊ शकतात. किंवा जास्त वजन असलेली व्यक्ती जास्त काळ जिवंत शकते.
अन्न-पाण्याशिवाय काय होत… वेगवेगळे आहेत टप्पे
वॉशिंग्टन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ रँडल पॅकर यांनी यावर संशोधन केले आहे. त्यात असे आढळून आले की अतिशय उष्ण वातावरणात प्रौढ व्यक्तीच्या शरीरातून 1 ते 1.5 लिटर पाणी घामाच्या स्वरूपात शरीरातून बाहेर पडते. या काळात पाणी न मिळाल्यास निर्जलीकरणाचा (शरीरातील पाणी कमी होणे) पहिला टप्पा येतो. यामुळे तहान लागते, ही गरज भागवण्यासाठी शरीर वेगाने ऑक्सिजन पंप करते आणि शरीराच्या वजनाच्या 2% पर्यंत खर्च होतो, पण हे दिसून येत नाही.
हे ही वाचा >> Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण
दुसऱ्या टप्प्यात दिसू लागतात लक्षणे
थकवा आणि डोकेदुखी सुरू होते. तसेच लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. मूत्रपिंडातून मूत्राशयात कमी पाणी पोहोचते, त्यामुळे लघवीचा रंग गडद होतो. घाम येणे कमी होऊ लागते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. हा इशाराच असतो. म्हणजे रक्त घट्ट होत आहे. ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी हृदय आता वेगाने काम करते. यावेळी आपल्या शरीराच्या वजनाच्या 4% पर्यंत कमी होते. त्यामुळे बीपी कमी होऊन चक्कर येते.