New Rule 2025 : नवीन वर्षात बदलणार 'हे' 10 मोठे नियम! तुमच्या खिशाला लागणार कात्री?
Rule Changes From January 1 : नवीन वर्षासोबतच पर्सनल फायनान्स आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधीत अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2025 पासून असे अनेक नियम लागू होणार आहेत
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवीन वर्षात कोणते नियम बदलणार?

कारच्या किंमतीत होणार वाढ

LPG सिलेंडरच्या किंमतीत होणार बदल
Rule Changes From January 1 : नवीन वर्षासोबतच पर्सनल फायनान्स आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधीत अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2025 पासून असे अनेक नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि फायनान्सशियल प्लॅनिंगवर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतींपासून पेंशन आणि यूपीआयच्या सुविधांमधील नियमांचा समावेश आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
1) LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकार एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करते. यावेळी 1 जानेवारी 2025 ला सिलेंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. 14 किलोच्या घरेलू सिलेंडरची किंमत खूप काळापासून स्थिर होती. परंतु, कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालंय.
2) कारच्या किंमतीत वाढ
जर तुम्ही कार खरेदी करणार असाल, तर 1 जानेवारी पासून तुम्हाला जादाचे पैसे मोजावे लागतील. मारुती सुझूकी, ह्युंदाई, महिंद्रा, आणि बीएमडब्ल्यू कारच्या किंमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
3) रेशन कार्डसाठी ई-केवायसी आवश्यक
सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केलं आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसलेले रेशन कार्ड 1 जानेवारी 2025 पासून रद्द केले जातील.