Heart attack आणि पॅनिक अटॅकमध्ये काय आहे फरक? कोणता अधिक जीवघेणा?
Panic Attack vs Heart Attack : in today’s time even younger people are facing the problem of heart attack. At the same time, along with heart attack, the problems of panic attack are also increasing.
ADVERTISEMENT
Heart Attack vs Panic Attack : बदलत्या किंवा वाईट जीवनशैलीमुळे आज लोक अनेक आजारांना बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. पूर्वी वयस्क लोकांना हृदयविकाराचा झटका येत असे, पण आता तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. हृदयविकाराच्या झटक्यासोबतच पॅनिक अटॅकच्या घटनाही वाढत आहे. (What is the difference between heart attack and panic attack?)
ADVERTISEMENT
तज्ज्ञांच्या मते पॅनिक अटॅक हा हृदयविकाराच्या झटक्याइतकाच धोकादायक आहे. बर्याच वेळा लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅक या दोन्ही गोष्टी समान वाटतात. त्यामुळे लोकांना त्यांना कोणता अटॅक आलाय, हे समजत नाही. जर तुम्हालाही या दोघांमधला फरक कळत नसेल तर हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या… (Is A panic attack worse than a heart attack?)
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? (What is Heart Attack)
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमन्या 100% ब्लॉक होतात, तेव्हा माणसाला हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक प्रकारची लक्षणे माणसाला दिसतात. यापैकी, छातीत दुखणे किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणे, घाम येणे किंवा उलट्या होणे ही सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे लगेच किंवा काही तासांनंतर दिसतात.
हे वाचलं का?
वाचा >> ‘घरी एकटी असली की भाऊ करतो बलात्कार, आई म्हणते ‘गप्प रहा’
पॅनिक अटॅक म्हणजे काय? (What is Panic Attack)
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पॅनिक अटॅक हा एक प्रकारची चिंताच आहे, जी खूप गंभीर असण्यासोबतच अचानक विकसित होते. पॅनिक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वाढणे, तसेच श्वासोच्छवासाचा त्रास, डोके फिरणे आणि शरीर थरथरणे इत्यादी लक्षणे विकसित होतात.
हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅकची लक्षणे
अहवालानुसार, ब्रिटनच्या आरोग्य तज्ञांनी सांगितले की हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅक या दोन्हींमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे अशी लक्षणे समान आहेत.
ADVERTISEMENT
हृदयविकाराचा झटका आणि पॅनीक अटॅकमधील फरक
ब्रिटनच्या आरोग्य तज्ञांनी त्यांच्या अहवालातील मुख्य फरक सांगितला की पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो, मग तुम्ही आराम करत असाल किंवा झोपत असाल तेव्हाही.
ADVERTISEMENT
वाचा >> Kalwa Hospital :कळवा रुग्णालयात ज्यांना मृत्यूने गाठलं, ‘त्या’ 18 रुग्णांची नावं काय?
त्याचबरोबर जास्त काम करत असताना हृदयविकाराचा झटका येतो आणि हृदयविकाराचा झटका फक्त छातीपर्यंत राहत नाही, तर अनेक लोकांना हा त्रास हात आणि मानेपर्यंत जाणवतो.
हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅक कसा टाळायचा?
जर तुम्हाला अचानक छातीत दुखत असेल, जे 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असेल आणि वेदना इतर अवयवांमध्ये पसरत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. हृदयविकाराचा झटका आल्यास कोणत्याही प्रकारचा विलंब घातक ठरू शकतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा पॅनिक अटॅक येत असल्यास योग्य उपचार घ्या. तुम्हाला लक्षणे नियंत्रित करण्यासाठी काही औषध दिले जाऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT