Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! पुन्हा कधी मिळणार 1500 रुपये? 'ही' माहिती एकदा वाचा
Mazi Ladki Bahin Yojana Fund Update : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार?
निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेबाबत दिली मोठी अपडेट
...तरच महिलांच्या खात्यात जमा होतील पैसे, 'हे' निकष वाचा
Mazi Ladki Bahin Yojana Fund Update : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2.4 कोटींहून अधिक पात्र महिलांना पाच हफ्त्त्यांचे पैसे मिळाले आहेत. परंतु, निवडणुकीदरम्यान महिलांना पुढील हफ्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. कारण लाडकी बहीण योजना औपचारिकपणे बंद केल्याची चर्चा आहे. जाणून घेऊयात यामागचं कारण काय आहे?
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाने दिले आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने आचारसंहिता कालावधी दरम्यान मतदारांना प्रभावीत करणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्या, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! लाडकी बहीण योजना बंद होणार? निवडणुकीआधी समोर आली सर्वात मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?
निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाकडून या योजनेची रक्कम थांबवण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची रक्कम एकत्रित दिली आहे. त्यामुळे आता डिसेंबरच्या हफ्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हे वाचलं का?
मतदारांना थेट आर्थिक मदत देऊन प्रभावित करणाऱ्या योजना तत्काळ बंद करा, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कालिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली आहे.
हे ही वाचा >> Optical Illusion: झाडावर दिसतात सुंदर पक्षी! पण बसलेत किती? 5 सेकंदात सांगा अचूक उत्तर
या योजनेसाठी पात्रता निकष
अर्ज करण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या महिलांचं वय 21 ते 65 वर्षांमध्ये असलं पाहिजे. सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, निराधार महिला यासाठी पात्र आहेत. कोणत्याही बँकेत अर्ज करणाऱ्या महिलेच्या नावाचं खातं असलं पाहिजे. अर्जदाराचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT