Ladki Bahin Yojana: ...तरच खात्यात जमा होतील 4500 रुपये! महिलांनो, 'हे' काम आताच करा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mazi Ladki Bahin Yojana Third Installment
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या किंमतीची आकडेवारी पाहून थक्कच व्हाल

point

आठवडाभरात सोने-चांदीच्या भावात काय झाले बदल?

point

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने सोने-चांदीच्या भावाबाबत दिला मोठा रिपोर्ट

Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांनी तातडीनं करायची आहेत. नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे गमावू शकता. यासाठी तुम्हाला नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ADVERTISEMENT

या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे, तो अर्ज मंजूर झाला असेल. पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता, त्यावेळी आधारकार्डशी संबंधीत अससेली माहिती भरावी लागते. तसच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसच आधारकार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं.

हे ही वाचा >> Gold Rate : बाईईई! काय तो सोन्याचा भाव! स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत झाले मोठे बदल

त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधारकार्डशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांचं नशीब खुलणार, तर काही राशींसाठी धोक्याची घंटा

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीय. 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसै जमा होतील असं बोललं जात आहे. सर्व महिलांनी तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा करा. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT