Gold Rate : बाईईई! काय तो सोन्याचा भाव! स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत झाले मोठे बदल
Today Gold Rates :गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मोदी 3.0 सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण झाली आणि सोनं प्रति 10 ग्रॅम 67000 रुपयांच्या आसपास पोहोचलं होतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोन्याच्या किंमतीची आकडेवारी पाहून थक्कच व्हाल
आठवडाभरात सोने-चांदीच्या भावात काय झाले बदल?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने सोने-चांदीच्या भावाबाबत दिला मोठा रिपोर्ट
Today Gold Rates :गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मोदी 3.0 सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण झाली आणि सोनं प्रति 10 ग्रॅम 67000 रुपयांच्या आसपास पोहोचलं होतं. परंतु, ऑगस्ट महिन्यात किंमतीत वाढ झाली. त्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याचं सत्र सुरुच राहिलं. गेल्या आठवड्यापासून सोनं महाग झालं आहे. परंतु, आधीच्या किंमतीपेक्षा सोनं काहीसं स्वस्तही झाल्याचं पाहायला मिळालं. (Gold prices have been fluctuating for the past few days. The Modi 3.0 government had announced a reduction in customs duty on gold in the budget)
एक आठवड्यात सोन्याच्या किंमतीत झाले मोठे बदल
सोन्याच्या आठवडाभराच्या किंमतीबाबत एमसीएक्स (MCX) ने दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबरला सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 71,426 रुपये इतकी होती. परंतु, 13 सप्टेंबरला सोन्याचा भाव वाढून प्रति 10 ग्रॅम 73510 रुपये इतका झाला. सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात 2084 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, ही किंमत जुलै महिन्याच्या हाय लेव्हलच्या तुलनेत स्वस्त आहे. 23 जुलै मोदी सरकारने अर्थसंकल्प घोषित केला होता. परंतु, त्याआधी 16 जुलै 2024 ला सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 74644 रुपये इतका होता.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांचं नशीब खुलणार, तर काही राशींसाठी धोक्याची घंटा
बाजारात काय आहे सोन्याचा भाव?
घरेलू मार्केटमध्येही सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) वेबसाईटनुसार, 6 सप्टेंबरला फाइन गोल्ड (999)ची किंमत प्रति 10 ग्रॅम 71,931 रुपये होती. पण 13 डिसेंबरला सोन्याच्या भावात वाढ झाली आणि प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 73,040 इतकी झाली. म्हणजेच 24 कॅरेट गोल्डच्या किंमतीत एका आठवड्यात 1109 रपयांची वाढ झाली आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट गोल्डच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73040 रुपये इतकी आहे. 22 कॅरेट गोल्डच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71,290 रुपये एव्हढी आहे. 20 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,010 रुपये आहे. 18 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,170 रुपये एव्हढी आहे. तर 14 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47110 रुपये इतकी आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : "सरकारकडून शेतकऱ्यांना मदत...", राज्यातील ओल्या दुष्काळाबाबत अजित पवार काय म्हणाले?
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या भावात काय बदल झाला?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 23 जुलैला मोदी 3.0 अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सोन्याच्या किंमती अचानक घसरल्या होत्या. अर्थसंकल्पामुळे अनेक बदल झाले होते. सोन्या-चांदीच्या भावातही मोठे बदल झाले. सरकारने सोन्यावर लागणारी कस्टम ड्युटीला 15 टक्क्यांनी कमी करून 6 टक्क्यांपर्यंत आणली होती. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावात झाला. सोन्याच्या भावात जवळपास 4000 रुपयांची घसरण झाली होती.
चांदीच्या किंमती वाढल्या
सोन्यासोबत चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एमसीक्सनुसार, गेल्या आठवड्यात चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. 6 सप्टेंबरला एक किलो चांदीचा भाव 82,757 रुपये इतका होता. तर 13 सप्टेंबरला ही किंमत 89244 रुपयांपर्यंत पोहोचली. दरम्यान चांदीच्या किंमतीत 6487 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 16 जुलैला एससीएक्सवर चांदीचा प्रति किलोचा भाव 96,451 रुपये इतका होता. तर घरेलू मार्केटमध्येही चांदी 94000 रुपयांपर्यंत पोहोचली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT