दिल्लीत पोहचताच फडणवीस म्हणाले, 'आमच्या दोन्ही साथीदारांना...'; जागावाटपावर मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

फडणवीस जागा वाटपावर शिंदे-पवारांबाबत काय म्हणाले?
फडणवीस जागा वाटपावर शिंदे-पवारांबाबत काय म्हणाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

point

जागा वाटपावर काय म्हणाले फडणवीस?

point

अमित शाहांकडून शिंदे-पवारांना काय फॉर्म्युला?

Devendra Fadnavis Statement on Mahayuti Seat Sharing: नवी दिल्ली: भाजप नेते अमित शाह हे काल (5 मार्च) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. याचवेळी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेला 10 आणि अजित पवारांना 6 जागा देण्यात येतील असं शाहांनी सांगितलंच सूत्रांकडून समजतं आहे. (as soon as devendra fadnavis reached delhi said we will give seats to  parties of both eknath shinde and ajit pawar with due respect a big statement on seat allocation)

ज्यानंतर याबाबत बरीच चर्चा ही राज्यभरात सुरू झाली. या सगळ्याचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहे. कारण ज्या शिवसेनेसाठी भाजपने 2019 मध्ये 23 जागा सोडल्या होत्या त्याच शिवसेनेला केवळ 10 जागा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 

यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच नाराजी असल्याची चर्चा आहे. मात्र, याच दरम्यान भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा> 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकू शकतं? बघा संपूर्ण यादी

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीला जागांबाबत चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये बोलावलं. दरम्यान, दिल्लीत पोहचताच देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील एक मोठं विधान केलं आहे.  

दिल्लीत पोहचताच देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण रणनिती काय असेल त्याचं टाइमटेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे.. अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात प्रत्येक राज्याच्या कोअर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील इथे बोलावलं आहे. आमच्याशी आता त्यांची चर्चा होईल.'

ADVERTISEMENT

'आपण पहिल्या यादीत पाहिलं असेल की, जिथे युती आहे त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही. कारण युतीत जे पक्ष सोबत असतात त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते. पहिल्या यादीत जिथे फक्त भाजप लढतो अशाच राज्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता युतीत असलेली राज्यं येतील.. तुम्ही काळजी करू नका.. तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा> Maharashtra 48 MP: तुमचा खासदार सध्या नेमका कोणासोबत?

'योग्य वेळी सगळ्या प्रकारचे आमचे जे काही निर्णय होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहचवू.' 

'खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे की, आमच्या मित्रपक्षांना एक डिजिट, अर्धे डिजिट जागा मिळणार आणि एवढेच मिळणार.. मला असं वाटतं की, अशाप्रकारे पतंगबाजी करणं हे अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ.'  

'त्यामुळे हे जे काही मीडियाच स्वत:हून जे ठरवतंय. की, एवढ्याच जागा मिळणार, तेवढ्याच जागा मिळणार.. हे मीडियाने बंद केलं पाहिजे.. हे अतिशय चुकीचं आहे.. ही धादांत चुकीची बातमी आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपामध्ये शिंदे-पवारांना योग्य जागा मिळतील असं म्हटलं आहे.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT