Lok Sabha 2024 : मुंबईतील 4 जागांसाठी ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार ठरले?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तयारी.
uddhav Thackeray's Shiv Sena will be contest four seat in mumbai
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४

point

मुंबईतील चार जागा ठाकरे गट लढणार?

point

कोण आहेत संभाव्य उमेदवार?

Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नसलं, तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना कामाला लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक समन्वय जाहीर केले. त्यातून बरेच संकेत मिळत असून, ठाकरेंची सेना मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. यासाठी उमेदवारांची नावेही निश्चित झाल्याचे समजते. (Thackeray's Shiv Sena May Fight four seats in Mumbai)

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नसले, तरी आघाडीतील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंनी १८ लोकसभा मतदारसंघांसाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर केले. यात मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

ठाकरेंनी आधीच घेतला होता निर्णय

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढवायच्या याची तयारी उद्धव ठाकरेंनी आधीच केली होती. ऑक्टोबरमध्ये मातोश्रीवर एक आढावा बैठक झाली होती. त्या बैठकीत  या मुद्द्यावर निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते. 

हे वाचलं का?

मुंबईतील कोणते मतदारसंघ ठाकरेंना हवेत?

राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चार जागा लढवण्याचा ठाकरेंची तयारी सुरू आहे. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईतून ठाकरे उमदेवार देऊ शकतात. 

कोण असू शकतात संभाव्य उमेदवार?

काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी विलास पोतनीस, दत्ता दळवी, रवींद्र मिर्लेकर सुधीर साळवी आणि सत्यवान उभे यांची निवडणूक समन्वयक म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे चार जागा लढवणार या चर्चेला बळ मिळाले आहे. 

ADVERTISEMENT

ठाकरेंकडून दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि उत्तर  पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांचे सुपूत्र आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची नावे जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. चौथी जागा आहे ईशान्य मुंबईची, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. 

ADVERTISEMENT

39 जगांचं वाटप, 9 जागांमुळे पेच

महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत ३९ जागांचे वाटप झाले आहे. एकूण ४८ जागा असून, ९ जागांवर अजून तिन्ही पक्षांचे एकमत झालेले नाही. या जागांचा तिढा दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेनंतर होऊ शकते. तसे संकेत शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT