Ajit Pawar : अजितदादांच्या 8 उमेदवारांविरोधात शिवसेना-भाजपचेच बंडखोर, पाहा कोणकोणत्या जागांवर डोक्याला ताप?

मुंबई तक

महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या उमेदवारांविरोधात महायुतीमधीलच 13 उमेदवारांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते. त्यातल्या पाच उमेदवारांनी माघार घेतली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांच्या उमेदवारांविरोधात महायुतीतलेच बंडखोर

point

अजित पवार यांच्या अडचणी वाढणार?

point

कोणकोणत्या मतदारसंघात महायुतीत पेच?

Ajit Pawar Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी आज 4 नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. जागावाटप झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी तिढा कायम होता. इच्छुक असूनही उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरलेत. त्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर काही ठिकाणी बंड शमवण्यात नेते यशस्वी झालेत. तर काही ठिकाणी अजूनही तिढा कायम आहे. 

 

हे ही वाचा >>Mahim: अमित ठाकरेंना लढाई आणखी कठीण, सदा सरवणकरांचा सर्वात मोठा निर्णय!

 

महायुतीसोबत असलेल्या अजित पवार यांच्यासमोर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक आव्हानं असणार आहे. वेगळी भूमिका घेऊन शरद पवार यांच्यापासून वेगळे झालेले अजित पवार यांच्यासमोर स्वत:ला सिद्ध करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील अंतर्गत कलहांना देखील त्यांना सामोरं जावं लागणार आहे. कारण महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या उमेदवारांविरोधात महायुतीमधीलच 13 उमेदवारांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते. त्यातल्या पाच उमेदवारांनी माघार घेतली. मात्र अजूनही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 8 उमेदवार हे अजित पवार यांच्या उमेदवारांच्या विरोधात आहेत. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp