Mahim: अमित ठाकरेंना लढाई आणखी कठीण, सदा सरवणकरांचा सर्वात मोठा निर्णय!
Maharashtra Assembly Elections 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी माहीम विधानसभा निवडणूक ही आता अधिक कठीण झाली आहे. कारण या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
ADVERTISEMENT

Sada Saravankar: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम या मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. पण यामुळेच महायुतीत या मतदारसंघात मोठा राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. अमित ठाकरेंना निवडणूक सोप्पी जावी यासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं भाजपकडून सातत्याने बोललं जात होतं. मात्र, असं असूनही सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांनी उघडपणे अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. अमित ठाकरेंची पहिलीच निवडणूक असल्याने त्यांचा विजय सोप्पा व्हावा यासाठी सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र, या ठिकाणी आपण निवडणूक लढवण्यावर शिवसेना (शिंदे गट) ठाम आहे.
हे ही वाचा>> Devendra Fadnavis : 'मी स्वत: त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करेन...', फडणवीसांनी कोणाला दिला शब्द?
या निवडणुकीसाठी राज ठाकरे मोठी फिल्डिंग लावतील अशी एक सहज शक्यता व्यक्त केली जात होती. राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी घेताना दिसले होते. त्यामुळेच ते आगामी निवडणुकीत महायुतीतील पक्षांची मदत घेतील किंवा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत लढतील असं चित्र होतं. मात्र थेट अमित ठाकरे यांच्याविरोधातच शिंदेंनी उमेदवार दिल्यानं या सर्व शक्यता मावळल्या आहेत.
सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केल्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि मनसेमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महेश सावंत यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं आहे.










