Amit Shah : "आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर...", अमित शाह 'हे' काय बोलून गेले
Amit Shah On Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी जनतेला संबोधीत करताना शाह यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अमित शाहांनी प्रसिद्ध केला भाजपचा जाहीरनामा
महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार?
विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाहांचं मोठं विधान
Amit Shah On Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी जनतेला संबोधीत करताना शाह यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलं. 'आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण निवडणुकीनंतर बैठक घेऊन याबाबत विचार विनिमय केला जाईल, असं मोठं विधान शाहांनी केलं.
ADVERTISEMENT
शाहांनी शरद पवारांवर साधला निशाणा
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर शाहांनी शरद पवारांवर टीका केली. शाहा म्हणाले, यावेळी आम्ही मुख्यमंत्र्याची निवड करण्यात शरद पवारांना संधी देणार नाही. शरद पवारांना खोट्या गोष्टी सांगण्याची आवड आहे. पण यावेळी त्यांच्या रणनीतीला यश येणार नाही.
भाजपचा जाहीरनामा केला प्रसिद्ध
भाजपने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. तसच भावांतर योजनाही लागू करण्याचं शाहांनी जाहीर केलं. "राज्यात 25 लाख नवीन नोकऱ्या दिल्या जातील. राज्यात स्किल सेंटर्स सुरु करणार. वृद्घांना पेन्शन योजनेच्या माध्यमातून दरमहा 2100 दिले जातील", असं आश्वासनही शाहांनी जनतेला दिलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Sanjay Raut : लाडक्या बहिणींना पैसे काय मोदी, शाह, फडणवीस, शिंदेंच्या... महाडिकांच्या वक्तव्यावर राऊत भडकले
'भाजपचा जाहीरनामा आशा अपेक्षांचा प्रतिबिंब आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की, सावरकरांबाबत चांगले शब्द बोलण्यासाठी राहुल गांधींना तुम्ही सांगणार आहात का?', असा सवाल उपस्थित करत शाहांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. मागील निवडणुकीत भाजपला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54, आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. पण निवडणुकीनंतर शिवसेनेनं एनडीएसोबत युती तोडली आणि एनसीपी आणि काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं होतं.
हे ही वाचा >> Manoj Jarange : कुणाला पाडायचं ते जरांगेंनी स्पष्ट सांगितलं, पत्रकार परिषदेत काय काय मुद्दे मांडले?
भाजपच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवण्यात येणार आहे. 25 लाख रोजगारांची निर्मिती, 10 लाख विद्यार्थ्यांना वेतन, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन 30 टक्के कमी करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT