Amit Shah Dhule : इंदिरा गांधी स्वर्गातून खाली आल्या तरी... धुळ्यातील भाषणात अमित शाह काय म्हणाले?
धुळ्यात असताना अमित शाह यांनी 370 बद्दल बोलताना थेट इंदिरा गांधींचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमित शाहांची गांधी कुटुंबावर टीका

टीका करताना थेच इंदिरा गांधींचाही उल्लेख

धुळ्याच्या सभेत काय म्हणाले शाह?
Amit Shah Dhule Sabha : अवघ्या काही दिवसांवर राज्यातल्या विधानसभा निवडणुका आल्या असून, पुढच्या दहा दिवसात त्या विधानसभा निवडणुकांचे निकालही लागलेले असतील. अशातच निवडणुका जवळजवळ येत असताना प्रचाराचा जोरही वाढत चालला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज सध्या महाराष्ट्राच्या मैदानात आहेत. अशातच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा सध्या महाराष्ट्रात आहेत. काही दिवसांपूर्वी धुळ्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली होती, त्यानंतर आता आज अमित शाह आज धुळ्यात होते. धुळ्यात असताना अमित शाह यांनी 370 बद्दल बोलताना थेट इंदिरा गांधींचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला.
हे ही वाचा >>Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले
धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा इथे बोलत असताना अमित शाह म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत कलम 370 काश्मीरमध्ये लागू केलं जाणार नाही. तसंच महाविकास आघाडीवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.महाविकास आघाडीला महाविनाश आघाडी म्हणत त्यांनी निशाणा साधला. त्यामुळे तुम्हाला महायुतीच्या रुपात विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचं की उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचं आहे असं अमित शाह म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी आली तर राज्यातला पैसा दिल्ली काँग्रेसला जाईल. मात्र महायुती आली तर शिवरायांच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीतून इथे पैसे येईल असं अमित शाह म्हणाले.