Congress Candidates 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी आली समोर, MVA मध्ये नवं राजकारण?

रोहित गोळे

Maharashtra Assembly Election 2024 congress 2nd list of Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने आता त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये काँग्रेसने ... उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.

ADVERTISEMENT

Congress Constituency Wise 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी
Congress Constituency Wise 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

point

दुसऱ्या यादीत काँग्रेसने कोणाला दिली उमेदवारी?

point

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीनंतर मविआमध्ये नवं राजकारण?

Maharashtra Vidhansabha Election 2024 Congress 2nd List of Candidates: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी काँग्रेसने आता त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा केली. या बैठकीत राहुल गांधी यांनी जागा वाटपाबाबत राज्यातील नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीनंतर आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. 

पहिल्या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. आता दुसऱ्या यादीत काँग्रेसने 23 उमेदवारांना तिकीट जाहीर केलं आहे. 

हे ही वाचा>> Ajit Pawar Candidate List : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा, किती उमेदवार आयात केलेत?

मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत. 

अधिक प्रमाणात बंडखोरी होऊ नये यासाठी देखील ही रणनीती असण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरीही ज्या पद्धतीने यादी जाहीर होण्यास विलंब होत आहेत त्यामुळे अनेक नेत्यांच्या मनात मात्र चलबिचल सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp