Shiv Sena (Shinde) Candidates List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर.. कोणाला दिला धक्का?
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पाहा एकनाथ शिंदेंनी नेमकं कोणा-कोणाला निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

CM शिंदेंनी जाहीर केले त्यांचे उमेदवार

विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा?

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (Shinde group) 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मध्ये ज्या पक्षाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं त्या पक्षाने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. सत्ताधारी शिवसेने आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत शिंदेंनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीपासून महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचं वजन बरंच वाढलं आहे. भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा चांगला असल्याने आता त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढली आहे. जे या पहिल्या यादीतून देखील पाहायला मिळत आहे.
महायुतीमध्ये भाजप जरी सर्वाधिक जागा लढविणार असलं तरी शिवसेनेला देखील अधिक जागा मिळाव्या असा आग्रह शिवसेनेचा होता. अखेर आज पहिली यादी जाहीर करत त्यापैकी काही जागा शिंदेंना आपल्या पदरात पाडून घेण्यात यश आल्याचं दिसतं आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024: Raj Thackeray : राज काकांचा आता पुतण्याविरोधात उमेदवार, आदित्य ठाकरेंना 'हा' मनसैनिक भिडणार!
ठाकरेंना थेट भिडणारे एकनाथ शिंदे हे सध्या बरेच चर्चेत आहे. मुख्यमंत्री पद आल्यापासून शिंदेंनी आपल्या कामाची पद्धत आणखी बदलत त्यात आक्रमकता आणल्याचं दिसतं आहे. ज्याचा त्यांना पक्षाच्या पातळीवर फायदाही होताना दिसत आहे. मात्र, असं असलं तरीही सहानुभूतीचा मोठा फायदा हा ठाकरेंना होत असल्याने शिंदे हे चांगलेच अर्लट आहेत.