Maharashtra Elections : 70 मतदारसंघांमध्ये सोयाबीनच्या मुद्द्याची चर्चा, फटका कुणाला? राजदीपचा रिपोर्ट
राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या वातावरण काय आहे? सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या कि नाही? लोकांच्या मनातले मुद्दे काय आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात सोयाबीनच्या मुद्द्याची चर्चा

विधानसभेच्या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

महायुती की मविआ? मतदारांचा कौल कुणाला?
Maharashtra Assembly Elections : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उरलेल्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत प्रचार करण्याचं आव्हान सध्या सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सध्या इंडिया टुडेची टीम रिपोर्टींगसाठी राज्यभर फिरत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडीटर राजदीप सरदेसाई हे सुद्धा या निवडणुकीच्या रिपोर्टींगसाठी महाराष्ट्रात आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या वातावरण काय आहे? सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या कि नाही? लोकांच्या मनातले मुद्दे काय आहेत? हे जाणून घेण्याचा आलंय. विशेषत: विदर्भातील राजकीय वातावरण आणि जनतेच्या मतांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
- राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मोठा फटका बसला होता. त्यानंतर मात्र महायुतीने सक्रीय होत राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठी ताकद लावली होती. त्यामुळेह ही योजना किती प्रभावी ठरणार हे पाहणं महत्वाचं होतं. त्यामुळेच ही योजना लोकांपर्यंत पोहोचली असल्याचं दिसतंय.
- लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या महिलांपर्यंत पोहोचत आहेत. लाखो महिलांना या योजनेचा लाभ होतोय. मात्र दुसरीकडे याच महिला महागाईकडेही बोट दाखवताना दिसत आहेत.
हे ही वाचा >>PM Narendra Modi: "मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या...", शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हे' काय बोलून गेले
-
राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुढच्या काही दिवसातच लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. ही योजना लागू होताच, मध्य प्रदेश सरकारप्रमाणे हा निर्णय घेतला असं अनेकजणांकडून सांगण्यात आलं. मात्र सध्या ही राज्यात लाडकी बहीण योजनेचा दबदबा मध्यप्रदेशप्रमाणे नाही असं दिसून येतंय.